जॉन अब्राहमच्या 'फोर्स 2' चा अॅक्शनपॅक्ड ट्रेलर रिलीज

By Admin | Published: September 30, 2016 10:25 AM2016-09-30T10:25:42+5:302016-09-30T10:27:58+5:30

अभिनेता जॉन अब्राहमचा आगामी चित्रपट 'फोर्स 2' चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. 2011 मध्ये आलेल्या फोर्स चित्रपटाचा हा सिक्वेल आहे

John Abraham's 'Force 2' actionpaked trailer release | जॉन अब्राहमच्या 'फोर्स 2' चा अॅक्शनपॅक्ड ट्रेलर रिलीज

जॉन अब्राहमच्या 'फोर्स 2' चा अॅक्शनपॅक्ड ट्रेलर रिलीज

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 - अभिनेता जॉन अब्राहमचा आगामी चित्रपट 'फोर्स 2' चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. 2011 मध्ये आलेल्या फोर्स चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. दोन दिवसांपूर्वी जॉन अब्राहमने सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाचा पोस्टर शेअर केला होता. 'फोर्स 2' च्या निमित्ताने जॉन अब्राहम आणि सोनाक्षी सिन्हा प्रथमच एकत्र दिसणार आहेत.
 
फोर्स चित्रपटात जॉन अब्राहमने एका पोलीस अधिका-याची भुमिका निभावली होती. एसीपी यशवर्धनच्या भुमिकेतील जॉनला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती. त्यामुळे सिक्वेलमध्ये जॉन पुन्हा तीच भुमिका साकारताना दिसणार आहे.

(जॉन अब्राहमच्या 'फोर्स 2' चा पोस्टर रिलीज)
 
फोर्सचं दिग्दर्शन निशिकांत कामतने केलं होतं. मात्र सिक्वेलच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अभिनय देवने सांभाळली आहे. एम एस धोनी चित्रपटाच्या रिलीजवेळी चित्रपटगृहांमध्ये 'फोर्स 2' चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात येणार आहे. 18 नोव्हेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे.
 

Web Title: John Abraham's 'Force 2' actionpaked trailer release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.