"...आणि वडिलांकडे निघून जावं", इरफानच्या आठवणीत लेक भावुक; बाबिलच्या पोस्टने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 09:20 AM2024-04-25T09:20:17+5:302024-04-25T09:20:35+5:30

बाबिलने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. वडिलांच्या आठवणीत बाबिल भावुक झाला आहे.

irfan khan son babil khan shared criptic post on instagram said sometimes feel to give up | "...आणि वडिलांकडे निघून जावं", इरफानच्या आठवणीत लेक भावुक; बाबिलच्या पोस्टने वेधलं लक्ष

"...आणि वडिलांकडे निघून जावं", इरफानच्या आठवणीत लेक भावुक; बाबिलच्या पोस्टने वेधलं लक्ष

कोणताही गॉडफादर नसताना केवळ टॅलेंटच्या जोरावर अभिनेता इरफान खानने बॉलिवूडमध्ये नाव कमावलं. केवळ बॉलिवूडच नाही तर त्याने हॉलिवूडमध्येही अभिनयाचा डंका वाजवला. चार वर्षांपूर्वी इरफान खानने या दुनियेला अलविदा म्हटलं. त्याने अचानक घेतलेल्या एक्झिटने चाहत्यांना धक्का बसला होता. मात्र, आज इरफान खान आपल्यात नसला तरी त्याच्या अभिनयामुळे आजही तो प्रेक्षकांच्या मनात आहे. 

वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत इरफानचा लेक बाबिल खानही अभिनयात करिअर करत आहे. बाबिल सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच बाबिलने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. वडिलांच्या आठवणीत बाबिल भावुक झाला आहे. "कधी कधी वाटतं की हार मानून वडिलांकडे जावं", असं बाबिलने इन्स्टा पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

काही दिवसांपू्र्वीच बाबिल इरफान खानच्या आठवणीत भावुक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्याने आई सुतापा सिकदर आणि इरफान यांचा फोटो शेअर केला होता. "मी तुम्हाला मिस करतोय. तुम्हाला माहीत आहे का? मी तुमच्या छत्रीखाली उभा आहे. मला वाटतं आता पावसात डान्स करण्याची वेळ आली आहे", असं कॅप्शन त्याने पोस्टला दिलं होतं. 

इरफान खानने २०२०मध्ये या जगाचा निरोप घेतला. २९ एप्रिल २०२० रोजी कॅन्सरने त्याचं निधन झालं. 'सलाम बॉम्बे', 'लाइफ इन अ मेट्रो', 'द लंचबॉक्स', 'मदारी', 'लाइफ ऑफ पाय'  अशा सिनेमांमध्ये त्याने काम केलं होतं. 'जुरासिक वर्ल्ड', 'द अमेझिंग स्पायडर मॅन' या हॉलिवूड सिनेमांमध्येही तो झळकला होता.

Web Title: irfan khan son babil khan shared criptic post on instagram said sometimes feel to give up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.