आता कसा दिसतो आणि काय करतो '3 इडियट्स'मधील हा मिलीमीटर? 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2018 03:57 PM2018-06-15T15:57:40+5:302018-06-15T16:07:56+5:30

'3 इडियट्स' या सिनेमाची क्रेझ आजही बघायला मिळते. आजही अनेकजण हा सिनेमा आवडीने पाहतात. यातील एक एक भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

This Is How ‘Millimeter’ From 3 Idiots Looks Today | आता कसा दिसतो आणि काय करतो '3 इडियट्स'मधील हा मिलीमीटर? 

आता कसा दिसतो आणि काय करतो '3 इडियट्स'मधील हा मिलीमीटर? 

googlenewsNext

मुंबई : '3 इडियट्स' या सिनेमाची क्रेझ आजही बघायला मिळते. आजही अनेकजण हा सिनेमा आवडीने पाहतात. यातील प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मग ती मोठी भूमिका असो वा छोटी. या सिनेमातील अशीच एक छोटी पण सर्वांच्या लक्षात असलेली भूमिका म्हणजे बालपणीचा मिलीमीटर. 

होस्टेममध्ये मुलांचे कपडे इस्त्री करुन देणारा, त्यांना चहा देणाऱ्या मिलीमीटरची भूमिका राहुल कुमारने साकारली होती. पण या सिनेमानंतर त्याला फारसं काम मिळालं नाही. सिनेमांमध्येही भलेही तो दिसत नसला तरी छोट्या पडद्यावर तो दिसत आहे. 

आता हा मिलीमीटर म्हणजेच राहुल कुमार कसा दिसतो? काय करतो?  यावर एक नजर मारुयात.

राहुलने मिलीमीटरची भूमिका जिवंत केली होती. त्याचं कॉमेडीचं टायमिंग असो वा डायलॉग डिलिव्हरी सर्वामुळे तो प्रेक्षकांच्या खास लक्षात राहिला. '3 इडियट्स' हा सिनेमा येऊन आता 9 वर्ष झाली आहेत. त्यामुळे मिलीमीटरही आता चांगला मोठा झालाय आहे. 

राहुल कुमारचं एका नाटकातील काम पाहिल्यानंतर मिलीमीटरच्या या भूमिकेसाठी त्याची निवड दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी केली होती. 

त्यानंतर 23 वर्षीय राहुलने वेगवेगळ्या सिनेमांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यात 'ओंकारा', 'द ब्ल्यू अंब्रेला', 'जीना हैं तो ठोक डाल' या सिनेमात आणि 'द थीफ' या शॉर्ट फिल्समध्ये काम केलंय.

यासोबतच राहुल वेगवेगळ्या ब्रॅंडच्या जाहीरातींमध्येही दिसला आहे. त्यात ब्रिटानिया बिस्कीट, आयडिया सेल्युलर, आयपीएलच्या जाहीरातींचा समावेश आहे. त्यासोबतच तो 'यम हैं हम' या टीव्ही मालिकेतही दिसला. 

एक अभिनेता असण्यासोबतच राहुल एक चांगला गायकही आहे. '3 इडियट्स' मधील त्या भूमिकेने त्याला अफाट लोकप्रियता दिली. त्यानंतर त्याला काही कामही मिळाली. पण अजूनही तो एका मोठ्या आणि चांगल्या संधीच्या शोधात आहे. 
 

Web Title: This Is How ‘Millimeter’ From 3 Idiots Looks Today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.