ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 09:01 AM2024-05-14T09:01:55+5:302024-05-14T09:02:28+5:30

"...तर मी आज ३ मुलांची आई असते", ईशा गुप्ताने व्यक्त केली खंत

esha gupta said i would already hav 3 kids if i would not an actor talk about eggs freezing | ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."

ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."

ईशा गुप्ता ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'राज ३', 'जन्नत २', 'रुस्तम', 'बादशाहो', 'टोटल धमाल' अशा सुपरहिट सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. आश्रम या वेब सीरिजमुळे ईशा चर्चेत होती. अभिनयाबरोबरच ईशा तिच्या बोल्डनेसने चाहत्यांना घायाळ करते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने वैयक्तिक आयुष्य आणि लग्नाबाबत भाष्य केलं. ईशा सध्या बॉयफ्रेंड मॅन्युएलसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.  २०१७ साली Eggs Freeze केल्याचा खुलासाही ईशाने मुलाखतीत केला. 

ईशाने नुकतीच ईटाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली, "मी २०१७मध्येच मॅन्युएलला भेटण्याआधीच Eggs Freeze केले होते. २०१९ मध्ये मॅन्युएलला भेटण्याआधी जवळपास साडेतीन वर्ष मी सिंगल होते. जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा आमचं डेटिंगचं वय निघून गेलं होतं. त्यामुळे आम्ही रिलेशनशिपमध्येच येणार हे आम्हालाही माहीत होतं. जर हे रिलेशनशिप वर्क झालं तर आम्ही लग्न करणार, हे आम्ही आधीच ठरवलं होतं. आम्हाला लग्न करायचं आहे. आणि मुलंही हवी आहेत". 

"मला आधीपासूनच मुलांची आवड आहे. मॅन्युएललाही हे माहीत आहे. आणि तो वडील होण्यासाठी तयारही आहे. जेव्हा आम्ही लग्न करू तेव्हा IVF किंवा सरोगसीद्वारे आईवडील होण्याचा विचार करत आहोत. जेव्हा लग्न करू तेव्हा माझ्या आरोग्याच्या दृष्टीने आम्ही हा निर्णय घेणार आहोत. मी Eggs Freeze केले तेव्हा भारतात ही प्रोसेस खूप खर्चिक होती.  जर मी अभिनेत्री नसते तर आज ३ मुलांची आई असते. मला नेहमीच मुल हवं होतं," असं ईशाने पुढे सांगितलं. 

Web Title: esha gupta said i would already hav 3 kids if i would not an actor talk about eggs freezing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.