दलजीत कौरच्या भांगेत सिंदूर? दुसऱ्या पतीसोबतही घटस्फोट झाल्याची होती चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 12:18 PM2024-05-10T12:18:33+5:302024-05-10T12:19:45+5:30

निखिल पटेलसोबत दलजीतने दुसरं लग्न केलं होतं आणि नंतर ती नवऱ्यासोबत केनियाला शिफ्ट झाली होती. मात्र लग्नानंतर काही महिन्यातच ती पतीला सोडून भारतात परतली.

Dalljiet Kaur shares photo flaunts sindoor is she divorced again or not question remains | दलजीत कौरच्या भांगेत सिंदूर? दुसऱ्या पतीसोबतही घटस्फोट झाल्याची होती चर्चा

दलजीत कौरच्या भांगेत सिंदूर? दुसऱ्या पतीसोबतही घटस्फोट झाल्याची होती चर्चा

'इस प्यार को क्या नाम दूँ' मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दलजीत कौर (Dalljiet Kaur) गेल्या काही दिवसांपासून घटस्फोटामुळे चर्चेत आहे. निखिल पटेलसोबत दलजीतने दुसरं लग्न केलं होतं आणि नंतर ती नवऱ्यासोबत केनियाला शिफ्ट झाली होती. मात्र लग्नानंतर काही महिन्यातच ती पतीला सोडून भारतात परतली. शिवाय तिने लग्नाचे फोटोही डिलीट केले. अद्याप तिने घटस्फोट झाल्याची अधिकृत माहिती दिली नव्हती. दरम्यान आता तिने सिंदूर लावलेला एक फोटो पोस्ट केल्याने पुन्हा ती चर्चेत आली आहे.

दलजीत कौर गेल्या 4 महिन्यांपासून भारतातच आहे. मुलगा जेडनला घेऊन ती घरी परतली. तर निखिललाही पहिल्या पत्नीपासून दोन मुली आहेत. त्यांच्यासोबत दलजीतचं नातं चांगलं जुळलं होतं. पण मुलींना आणि नवऱ्याला सोडून ती परत आली आहे. निखिल आणि दलजीत यांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवरुन अनफॉलोही केलं. लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही दोघांनी एकही पोस्ट केली नाही. मात्र अचानक दलजीतने सिंदूर लावलेला फोटो शेअर केल्याने सर्वच आश्चर्यचकीत झालेत. तिने एक सेल्फी शेअर केला असून तिच्या हातात एक पुस्तक आहे.'पढाकू मोड ऑन' असं कॅप्शन तिने दिलं आहे. तिने सिंदूर लावलेलं दिसतंय मात्र गळ्यात मंगळसूत्र दिसत नाही. दलजीत आणि निखिल परत एकत्र आले आहेत का अशीही चर्चा सुरु झाली आहे.

दलजीतकडून आजपर्यंत तिच्या आणि निखिलाच्या नात्यावर स्पष्टीकरण आलेलं नाही. ती आईवडिलांच्या सर्जरीसाठी भारतात आली आहे असं ती म्हणाली होती. पण सोशल मीडियावरुन लग्नाचे फोटो डिलीट करण्याचं, एकमेकांना अनफॉलो करण्याचं कारण तिने सांगितलं नाही. दलजीतने याआधी टीव्ही स्टार शालीन भनोतशी लग्न केले होते. त्यांना जेडन हा मुलगा झाला. मात्र काही वर्षात त्यांचा घटस्फोट झाला. 

Web Title: Dalljiet Kaur shares photo flaunts sindoor is she divorced again or not question remains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.