चित्रपट ‘फन्ने खां’साठी ऐश्वर्याचा आहे हा लूक पाहा !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 10:49 AM2018-02-14T10:49:15+5:302018-02-14T16:19:18+5:30

फन्ने खां हा ऐश्वर्या राय बच्चनचा येणारा चित्रपट, प्रेक्षक या चित्रपटाची अतुरतेने वाट पाहत आहे, या चित्रपटाला घेऊन ती ...

Watch the look of the movie 'Fone Khan' on Aishwarya! | चित्रपट ‘फन्ने खां’साठी ऐश्वर्याचा आहे हा लूक पाहा !

चित्रपट ‘फन्ने खां’साठी ऐश्वर्याचा आहे हा लूक पाहा !

googlenewsNext
्ने खां हा ऐश्वर्या राय बच्चनचा येणारा चित्रपट, प्रेक्षक या चित्रपटाची अतुरतेने वाट पाहत आहे, या चित्रपटाला घेऊन ती फारच उत्सुक आहेत याचाच फायदा घेऊन फिल्म मेकर्सनी असे काही केले की प्रेक्षकांची या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अजूनच वाढली. झाले असे की चित्रपट निर्मिती करणारी किअर्ज इंटरटेन्मेंट ने ऐश्वर्या राय बच्चन चा ह्या चित्रपटातला फर्स्ट लूक ट्विटरवर शेअर केला.

किअर्ज इंटरटेन्मेंटने हा फोटो ट्विट करून पुढे लिहले "आमच्याकडे ऐश्वर्या राय बच्चन आहे आमची शायनिंग स्टार", ह्या फोटो मध्ये ऐश्वर्या खूपच सुंदर दिसत आहे. तिचा हा लुक पाहून "ए दिल है मुश्कील" च्या लुक ची आठवण करून देतो. हाती आलेल्या ताज्या बातमी नुसार ह्या चित्रपटात ऐश्वर्या एक गायिके ची भूमिका करत आहे, त्याच बरोबर चित्रपटात ऐश्वर्या ला आपल्या लुक ला घेऊन कोणतीही ताडजोड कारावयची नव्हती म्हणून तिने खास करून स्वतःच्या लुक आणि स्टाईलसाठी मनीष मल्होत्रा ची मदत घेतली.
फन्ने खां’ एक म्युझिकल कॉमेडी चित्रपट असून, त्यामध्ये ऐश्वर्याबरोबर अनिल कपूर आणि राजकुमार राव यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाला अतुल मांजरेकर दिग्दर्शित करीत आहेत.‘फन्ने खां’ आॅस्कर नॉमिनेटेड ‘एव्हरीबडी इज फेमस’ या डच चित्रपटाचा आॅफिशियल रिमेक आहे. अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय तब्बल दोन दशकांनंतर एकत्र काम करीत आहेत. या चित्रपटात ऐश्वर्या एका गायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात 3 गाणी ऐश्वर्यावर चित्रीत करण्यात आली आहेत.  चित्रपटाच्या सुरुवातीलाच ऐश्वर्याची एंट्री एका डान्स साँगसोबत होणार आहे. फन्ने खां’ एक म्युझिकल कॉमेडी चित्रपट असून, त्यामध्ये ऐश्वर्याबरोबर अनिल कपूर आणि राजकुमार राव यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाला अतुल मांजरेकर दिग्दर्शित करीत आहेत.‘फन्ने खां’ आॅस्कर नॉमिनेटेड ‘एव्हरीबडी इज फेमस’ या डच चित्रपटाचा आॅफिशियल रिमेक आहे. अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय तब्बल दोन दशकांनंतर एकत्र काम करीत आहेत. या चित्रपटात ऐश्वर्या एका गायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात 3 गाणी ऐश्वर्यावर चित्रीत करण्यात आली आहेत.  चित्रपटाच्या सुरुवातीलाच ऐश्वर्याची एंट्री एका डान्स साँगसोबत होणार आहे.