​वरूण धवन बनला को-स्टारचा बॉडीगार्ड, तुम्हीही पाहा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2018 09:58 AM2018-01-23T09:58:44+5:302018-01-23T15:28:44+5:30

‘अक्टूबर’ या चित्रपटाकडे वरूण धवनचे चाहते डोळे लावून बसले आहेत. होय, येत्या एप्रिलमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. ...

Varun Dhawan became co-star's bodyguard, you see too !! | ​वरूण धवन बनला को-स्टारचा बॉडीगार्ड, तुम्हीही पाहा!!

​वरूण धवन बनला को-स्टारचा बॉडीगार्ड, तुम्हीही पाहा!!

googlenewsNext
क्टूबर’ या चित्रपटाकडे वरूण धवनचे चाहते डोळे लावून बसले आहेत. होय, येत्या एप्रिलमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. त्यापूर्वी या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटात वरूणसोबत एक नवा कोरा चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. होय, हा नवा चेहरा कुणाचा तर बनिता संधू हिचा. होय, बनिता संधू ‘अक्टूबर’द्वारे बॉलिवूड डेब्यू करतेय आणि सध्या वरूण बनिताचा बॉडीगार्ड बनलाय. आम्ही हे काय बोलतोय, असे तुम्हाला वाटेल. पण हे खरे आहे. सध्या बनिता जिथे जाईल तिथे वरूण तिच्या बॉडीगार्डची भूमिका पार पाडताना दिसतोय. ताजे फोटो तरी हेच सांगताहेत.



बनिता इंडस्ट्रीत नवी आहे. तिच्यासाठी येथील पापाराझी कल्चर नवे आहे. पण वरूण धवन तूर्तास प्रत्येक पावलावर बनितासोबत आहे. काल वरूण व बनिताने चित्रपटाच्या संपूर्ण स्टारकास्टसोबत डिनर पार्टी एन्जॉय केली. या डिनर पार्टीनंतर वरूण व बनिता  रेस्टॉरंटमधून बाहेर पडले आणि लोकांनी एकच गर्दी केली. या गर्दीत वरूण पूर्णवेळ बनिताला प्रोटेक्ट करताना दिसला. बनिताला सुरक्षित कारपर्यंत पोहोचवल्यानंतर वरूण मागे वळला. यावेळी वरूणने मरून टी-शर्ट आणि ब्ल्यू जीन्स कॅरी केला होता. तर बनिताने ब्लॅक हाय नेक टी शर्ट व ब्लॅक पॅन्ट करी केला होता. या रिल लाईफ कपलची सेम टू सेमकॅप लक्ष वेधून घेत होती. पण त्याहीपेक्षा यांची केमिस्ट्री अधिक लक्षवेधी होती. चाहत्यांना तर ही केमिस्ट्री आवडली. आता चाहत्यांइतकीच ती वरूण धवन गर्ल फ्रेन्ड नताशा दलाल हिलाही आवडावी, एवढीच अपेक्षा होय ना ?

ALSO READ : ​नो प्रॉप्स, नो स्टुडिओ... असे शूट झाले ‘अक्टूबर’चे प्रमोशनल कॅम्पेन!

एनआरआय असलेली बनिता लंडनमध्ये राहते.  पंजाबी कुटुंबात जन्मलेली बनिता ११ वर्षांपासून अभिनय करतेय. ‘डबलमिंट’च्या ‘एक अजनबी हसीना से’ या गाण्यात ती दिसली होती. यू ट्यूबवरील हे गाणे तब्बल ६० लाख लोकांनी पाहिले होते. यानंतर बनिताने मागे वळून पाहिलेच नाही. 

Web Title: Varun Dhawan became co-star's bodyguard, you see too !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.