शाहिदनंतर टायगर श्रॉफनेदेखील घेतले नवीन घर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 05:20 PM2018-07-24T17:20:22+5:302018-07-24T17:23:25+5:30

टायगर श्रॉफने खार येथे ८ बेडरुम्सचे घर खरेदी केले आहे. या घराचे इंटेरिअर डिझाईनिंग जॉन अब्राहमचा भाऊ एलेनने केले आहे.

Tiger Shroff also took a new house after Shahid | शाहिदनंतर टायगर श्रॉफनेदेखील घेतले नवीन घर

शाहिदनंतर टायगर श्रॉफनेदेखील घेतले नवीन घर

googlenewsNext
ठळक मुद्देटायगरने खरेदी केले ८ बेडरुम्सचे घर टायगर 'स्टूडंट ऑफ द ईयर 2' सिनेमाच्या शूटिंगमध्ये आहे व्यग्र

बॉलिवूडचे सेलेब्स सध्या नवीन घर खरेदी करत असल्याचे दिसून येते आहे. अभिनेता शाहिद कपूरने वरळीत नवे घर घेतल्यानंतर आता अभिनेता टायगर श्रॉफने देखील मुंबईत घर घेतल्याचे सूत्रांकडून समजते आहे.  


काही दिवसांपूर्वी टायगर मुंबईत घराच्या शोधात असल्याची बातमी मिळाली होती. घरात त्याला ८ बेडरुम्स हवे होते. पण आता हा शोध थांबला आहे आणि टायगरला त्याच्या स्वप्नातील घर मिळाले आहे. २०१९ च्या शेवटापर्यंत टायगर नवीन घरात राहायला जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील खार येथे टायगरने ८ बेडरुम्सचे घर खरेदी केले आहे. या घराचे इंटेरिअर डिझाईनिंग जॉन अब्राहमचा भाऊ एलेनने केले आहे. यापूर्वी त्याने अनेक सेलिब्रेटींचे घर डिजाईन केले आहे.
अभिनेता टायगर श्रॉफच्या बागी 2 चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटातील टायगर व दिशा पटानी यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली. या सिनेमाने अनेक रेकॉर्ड तोडले. या सिनेमाचे दिग्दर्शन अहमद खान यांनी केले होते. स्टुडंट ऑफ द इअर’मध्ये निर्माता करण जोहरने तीन नवीन कलाकारांना लाँच केले होते. या चित्रपटामुळे डेविड धवनचा मुलगा वरुण धवन, निर्माता महेश भट्टची मुलगी आलिया भट्ट व सिद्धार्थ मल्होत्रा यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सध्या टायगर 'स्टूडंट ऑफ द ईयर 2' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या सिनेमातून दोन अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. आहना पांडे आणि तारा सुतारिया अशी या अभिनेत्रींची नावे आहेत. टायगरचे चाहते त्याचा आगामी चित्रपट स्टुडंट ऑफ द इअर 2ची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

Web Title: Tiger Shroff also took a new house after Shahid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.