सुपरस्टार रजनीकांत यांचा जावई धनुषचं मराठीत पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2018 10:05 AM2018-06-19T10:05:58+5:302018-06-19T15:48:17+5:30

साऊथचे कलाकार तिकडे हिट झाल्यावर आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवतात हे काही आता नवीन नाही. मात्र पहिल्यांदाच व्हाय धिस कोलावेरी ...

Superstar Rajinikanth's son-in-law, Dhanush debuts in Marathi | सुपरस्टार रजनीकांत यांचा जावई धनुषचं मराठीत पदार्पण

सुपरस्टार रजनीकांत यांचा जावई धनुषचं मराठीत पदार्पण

googlenewsNext
ऊथचे कलाकार तिकडे हिट झाल्यावर आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवतात हे काही आता नवीन नाही. मात्र पहिल्यांदाच व्हाय धिस कोलावेरी दी या गाण्याने सगळ्या तरुणाच्या गळ्यातील ताईत बनलेला धनुष मराठी पदार्पण करतो आहे. होय, तुम्ही बरोबर वाचलात साऊथचा अभिनेता आणि रजनीकांत यांचा जावई धनुष आता मराठीकडे वळला आहे. धनुषने आपल्या करिअरची सुरुवात गायक म्हणून केली होती. त्यानंतर तो साऊथचा सुपरस्टार झाला. रांझणा चित्रपटाच्या माध्यमातून त्यांने बॉलिवूडमध्ये सुद्धा डेब्यू केला. रांझणा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला हिट ठरला होता. साऊथ आणि बॉलिवूडनंतर धनुष आता मराठीमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. 

फ्लिकर या अमोल पाडवे दिग्दर्शित चित्रपट धनुषने मराठीत गाणं गायले आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट म्हणजे या गाण्याला संगीत प्रसिद्ध संगीतकार इलायाराजा यांनी दिले आहे. धनुष स्वत: इलियाराजा यांचा फॅन आहे. त्यामुळे हे गाणं म्हणजे सोने पे सुहागा असेच म्हणावे लागले. मंगेश कांगणेने हे गीत रचले आहे. धनुष याला मराठीमध्ये गाणं गाताना शब्दोच्चारात अडचण येऊ शकते हे लक्षात घेऊन मंगेश कांगणे याने सोपे शब्द असलेलं गाणं तयार केलं. प्रियकर आपल्या प्रेयसीसाठी गाणं गात असल्याचं या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. हे गाणं धनुष याने गायले आहे. चेन्नई काही महिन्यांपूर्वी या गाण्याचं रेकॉर्डींग करण्यात आले. सहा तासाता धनुषने हे गाणं रेकॉर्ड केल्याचे कळतेय. धनुषचे मराठी गाणं ऐकण्यासाठी त्याचे फॅन्स नक्कीच आतुर झालेले असतील.

काही महिन्यांपूर्वी आलेल्या ‘व्हीआयपी2’ चित्रपटात धनुष आणि काजोल यांनी एकत्र स्क्रिन शेअर केली होती. ‘व्हीआयपी2’ हा सन २०१४ मध्ये आलेल्या ‘व्हेलायिला पट्टधारी’ या चित्रपटाचा सीक्वल होता.  

Web Title: Superstar Rajinikanth's son-in-law, Dhanush debuts in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.