Blank Teaser ! सनी देओलचा अ‍ॅक्शन अवतार अन् करण कपाडियाचा दमदार डेब्यू!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 01:14 PM2019-04-02T13:14:44+5:302019-04-02T13:17:03+5:30

‘ब्लँक’ या सिनेमात सनी पुन्हा एकदा अ‍ॅक्शन अवतारात दिसणार आहे. काही क्षणांपूर्वी या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला. या टीजरमध्ये सनी पाजी जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसतोय.

sunny deol and karan kapadias upcoming film blank teaser out | Blank Teaser ! सनी देओलचा अ‍ॅक्शन अवतार अन् करण कपाडियाचा दमदार डेब्यू!!

Blank Teaser ! सनी देओलचा अ‍ॅक्शन अवतार अन् करण कपाडियाचा दमदार डेब्यू!!

googlenewsNext
ठळक मुद्देकरण हा डिंपल यांची बहीण सिंपल कपाडिया मुलगा आहे. सिंपलच्या मृत्यूनंतर डिंपल यांनीच करणला सांभाळले. त्यामुळे करण डिंपल यांना अगदी आईसारखे मानतो.

बॉलिवूड अभिनेता सनी देओल दीर्घकाळापासून बॉक्स ऑफिसवर परतण्याच्या प्रयत्नांत आहे. अर्थात अद्यापही त्याच्या प्रयत्नांना यश मिळू शकलेले नाही. सनी देओल बॉलिवूडचा एक अ‍ॅक्शन स्टार म्हणून ओळखला जातो. मधल्या काळात सनीने वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट केलेत. पण ‘अ‍ॅक्शन स्टार’ ही सनीची इमेज पक्की झाल्याने चाहत्यांना त्याचे हे सिनेमे फार पचनी पडले नाहीत. कदाचित सनीने हे हेरले आणि स्वत:साठी एक अ‍ॅक्शनपॅक्ड चित्रपट निवडला. होय, आम्ही बोलतोय ते सनीचा आगामी चित्रपट ‘ब्लँक’बद्दल.
‘ब्लँक’ या सिनेमात सनी पुन्हा एकदा अ‍ॅक्शन अवतारात दिसणार आहे. काही क्षणांपूर्वी या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला. या टीजरमध्ये सनी पाजी जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसतोय.




तुम्हाला ठाऊक असेलच की, ‘ब्लँक’ या चित्रपटातून डिंपल कपाडियाचा भाचा करण कपाडिया बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. चित्रपटाची कथा त्याच्याच पात्राभोवती फिरताना दिसेल. तूर्तास टीजर बघता, ‘ब्लँक’ची कथा पारंपरिक चित्रपटांपेक्षा अगदी वेगळी असल्याचे भासतेय. ‘आतंकवाद का कोई चेहरा नहीं होता’, या सनीच्या डायलॉगने टीजरची सुरुवात होते आणि ‘तू एक सुसाईड बॉम्बर है,’ या करण कपाडियाच्या डायलॉगने टीजर संपतो. या डायलॉग्सवरून चित्रपटात थ्रीलर आणि सन्पेन्सचा थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार, हे निश्चित आहे. अर्थात त्यापूर्वी प्रेक्षकांना ‘ब्लँक’च्या ट्रेलरची प्रतीक्षा असणार आहे.


करण हा डिंपल यांची बहीण सिंपल कपाडिया मुलगा आहे. सिंपलच्या मृत्यूनंतर डिंपल यांनीच करणला सांभाळले. त्यामुळे करण डिंपल यांना अगदी आईसारखे मानतो.करणची आई सिंपल कपाडिया ही सुद्धा बॉलिवूड अभिनेत्री होती. १९७७ मध्ये ‘अनुरोध’ या चित्रपटातून तिने डेब्यू केला होता.
‘ब्लँक’ हा चित्रपट बेहजद खंबाटा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. तनुश्री दत्ताची बहीण इशिता दत्ता यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  येत्या ३ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.  

Web Title: sunny deol and karan kapadias upcoming film blank teaser out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.