सोनम कपूरने लग्नासाठी केली 'या' जगातील महागड्या शहराची निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2018 07:19 AM2018-04-09T07:19:26+5:302018-04-09T16:04:10+5:30

सोनम कपूरने आगामी चित्रपट 'वीरे दी वेडिंग'ची शूटिंग पूर्ण केली आहे. यानंतर ती आता लग्नाच्या शॉपिंगला लागणार आहे. गेल्या ...

Sonam Kapoor married for '' world's most expensive city '' | सोनम कपूरने लग्नासाठी केली 'या' जगातील महागड्या शहराची निवड

सोनम कपूरने लग्नासाठी केली 'या' जगातील महागड्या शहराची निवड

googlenewsNext
नम कपूरने आगामी चित्रपट 'वीरे दी वेडिंग'ची शूटिंग पूर्ण केली आहे. यानंतर ती आता लग्नाच्या शॉपिंगला लागणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सोनम तिच्या लग्नाच्या चर्चेला घेऊन प्रसिद्धिच्या झोतात आहे. मात्र आता कन्फर्म बातमी आलीय की सोनम याचवर्षी लग्नाच्या गाठीत अडकणार आहे.  

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या लग्नानंतर सगळ्यांचे लक्ष कपूर खानदानच्या लाडक्या लेकीच्या लग्नावर लागले आहे. याआधी अशी माहिती होती की सोनम राजस्थानच्या जोधपूर किंवा उदयपुरमध्ये डेस्टिनेश वेडिंग करणार आहे. मात्र सोनमने लग्नासाठी जगातले सगळ्यात महागड्या शहराची निवड केली आहे.  

स्पॉटब्वॉयच्या रिपोर्टनुसार सोनम आणि आनंद आहुजाने लग्नाची तारीख आणि वेन्यू नक्की केला आहे. सोनम 9 ते 12 मे च्या मध्ये लग्न करु शकते आणि यासाठी तिने जगातील सुंदर शहर स्विझर्लंडमधील मॉन्ट्रो शहरची निवड केली आहे. लग्नाच्या वेन्यूला घेऊन स्विस सरकारने इंटरेस्ट दाखवला आहे.  सोनम कपूरचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र या लग्नात सहभागी होणार आहेत त्यासाठी त्यांनी एक आठवड्याची सुट्टी टाकली आहे.  

सोनम गेल्या 4 वर्षांपासून बिझनेसमन आनंद आहुजाला डेट करते आहे. दोघांना अनेक वेळा परदेशात पार्टीत करताना आणि एकत्र फिरताना पाहण्यात आले आहे.  सोनम अनेकवेळा आनंदसोबतचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असते. आनंद Bhane या फॅशन ब्रॅण्डचा मालक आहे. त्याने अमेरिकेतील व्हार्टन बिझनेस स्कूल येथून आपले शिक्षण पूर्ण केले. सोनमचा Bhane हा फेव्हरेट ब्रॅण्ड आहे. त्यामुळे बºयाचदा सोनम Bhane ने डिझाइन केलेले कपडे परिधान करून स्पॉट झाली आहे. 

ALSO READ :  See Video : ...तर यामुळे सोनम कपूरला म्हणतात ‘जिराफ’!

जूनमध्ये सोनमचा  'वीरे दी वेडिंग' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सोनमशिवाय करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या मुख्य भूमिका आहेत.‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटाची कथा चार मुलींभवती फिरणारी आहे.‘वीरे दी वेडिंग’मध्ये करिना एका आधुनिक मुलीच्या भूमिकेत तर सोनम दिल्लीतील मध्यमवर्गीय मुलगी साकारणार आहे

Web Title: Sonam Kapoor married for '' world's most expensive city ''

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.