सोनाक्षी सिन्हाचा दबंग 3 मधून पत्ता कट.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2018 07:18 AM2018-01-16T07:18:39+5:302018-01-16T12:48:39+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून सलमान खानचा आगमी चित्रपट दबंग 3 हिरोईनच्या कास्टिंगला घेऊन चर्चेत आहेत. कधी सलमान खानच्या अपोझिट यूलिया ...

Sonakshi Sinha cut the address from Dabang 3 .. Read details | सोनाक्षी सिन्हाचा दबंग 3 मधून पत्ता कट.. वाचा सविस्तर

सोनाक्षी सिन्हाचा दबंग 3 मधून पत्ता कट.. वाचा सविस्तर

googlenewsNext
ल्या अनेक दिवसांपासून सलमान खानचा आगमी चित्रपट दबंग 3 हिरोईनच्या कास्टिंगला घेऊन चर्चेत आहेत. कधी सलमान खानच्या अपोझिट यूलिया वंतूरचे नावसमोर येते तर कधी मौनी रॉयचे. मात्र आता दबंग 3 चा निर्माता अरबाज खानने याने एका गोष्टीवरुन अखेर पडदा उचलला आहे.

पहिली अशी चर्चा होती सलमान खानच्या शिफारशीनंतर चित्रपटात मौनी रॉयला साईन करण्यात आले. त्यानंतर मध्येच परिणीती चोप्राच्या नावाची ही चर्चा होती.   ‘मुन्नी बदनाम’ सारखे एक धम्माल आयटम साँग असणार आहे. पण या आयटम साँगमध्ये ‘मुन्नी’ नाही तर ‘सन्नी’ असणार आहे

दबंग 3 चे निर्माता अरबाज खानेन पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, सोनाक्षी सिन्हा 'दबंग 3' चा भाग नसणार आहे. स्क्रिप्टच्या अनुसार कलाकारांची निवड करण्यात येणार आहे.  अरबाज खान पुढे म्हणाला की, या वर्षाच्या मध्यापासून दबंग 3 चे शूटिंग सुरु होणार आहे. या चित्रपटाच्या सीक्वलचे दिग्दर्शन प्रभूदेवा करणार आहे. याआधी दबंगचे दिग्दर्शन अभिनव कश्यपने केले होते. 'दबंग 2' चे दिग्दर्शन अरबाज खानने केले होते. याचित्रपटातही चुलबुल पांडेची स्टोरी असणार आहे.    

ALSO READ :  ​‘दबंग’ सलमान खानने शेअर केला गर्लफ्रेन्डच्या गाण्याचा फर्स्ट लूक; नेटक-यांनी घेतली मजा!

सलमान खान 'दबंग 3'च्या आधी 'रेस3' च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसुझा करणार आहेत. यात सलमानसह  जॅकलिन फर्नांडिस, डेजी शहा आणि बॉबी देओल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगला मुंबईत सुरुवात देखील करण्यात आली आहे. या चित्रपटाची निर्मिती रमेश तौराणी करतायेत
तर सलमानचा गतवर्षाच्या शेवटी रिलीज झालेल्या ‘टायगर जिंदा है’ने 11 जानेवारीपर्यंत या चित्रपटाने 318.86 कोटी रुपयांची कमाई केली. तर ओवरसीज कमाईचा विचार केल्यास आतापर्यंत चित्रपटाने विदेशात 122.12  कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. एकूणच या चित्रपटाने जगभरात ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक कलेक्शन केले आहे. पाचशे कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळविणारा सलमानचा हा तिसरा चित्रपट ठरला आहे.

Web Title: Sonakshi Sinha cut the address from Dabang 3 .. Read details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.