​सिद्धार्थ मल्होत्रा नाही तर ‘या’ अभिनेत्यासोबत काम करण्यासाठी उतावीळ झालीय आलिया भट्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 10:12 AM2017-12-04T10:12:14+5:302017-12-04T15:42:14+5:30

करण जोहरच्या ‘स्टुडंट आॅफ द ईअर’मधून आपल्या करिअरची सुरुवात करणारी आलिया भट्ट आणि वरूण धवन यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड ...

Siddharth Malhotra is better not to work with the actor, 'Alia Bhatt! | ​सिद्धार्थ मल्होत्रा नाही तर ‘या’ अभिनेत्यासोबत काम करण्यासाठी उतावीळ झालीय आलिया भट्ट!

​सिद्धार्थ मल्होत्रा नाही तर ‘या’ अभिनेत्यासोबत काम करण्यासाठी उतावीळ झालीय आलिया भट्ट!

googlenewsNext
ण जोहरच्या ‘स्टुडंट आॅफ द ईअर’मधून आपल्या करिअरची सुरुवात करणारी आलिया भट्ट आणि वरूण धवन यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड भावली. कदाचित त्याचमुळे या जोडीने आत्तापर्यंत तीन हिट चित्रपट दिले आहेत. ‘स्टुडंट आॅफ द ईअर’ आलिया व वरूणचे तीन चित्रपट आलेत आणि तिन्ही हिट राहिलेत. निश्चितपणे या जोडीला पुन्हा एकत्र बघायला प्रेक्षकांना आवडेल. पण ताजी बातमी ऐकाल तर तुम्हीही चाट पडाल. होय, प्रेक्षकांपेक्षा आलिया हिच वरूणसोबत काम करण्यास उतावीळ झालीय. होय, ऐकता ते अगदी खरे आहे.



ताज्या मुलाखतीत खुद्द आलियानेच याचा खुलासा केला. मी दिग्दर्शक डेव्हिड धवनकडे अनेकदा ‘जुडवा3’मध्ये काम करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. या चित्रपटात काम करण्यास मी अधीर आहे. ‘जुडवा3’मध्ये मला घ्या, असे मी डेव्हिड सरांना सांगितले आहे. याचे कारण आहे, वरूण धवनची कॉमेडी. प्रेक्षकांना हसवणे सोपे काम नाही, असे आलिया म्हणाली.

ALSO READ : OMG !! ​करण जोहरने लाख मनधरणी करूनही आलिया भट्टने दिला प्रभासची हिरोईन बनण्यास नकार!!

मध्यंतरी वरूणमुळे आलिया व तिचा कथित बॉयफ्रेन्ड सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यात मतभेद निर्माण झाल्याची खबर होती. अर्थात हे मतभेद आता मिटलेत आणि आलिया व सिद्धार्थ यांचे पुन्हा पॅचअप झाले आहे. चित्रपटांबद्दल बोलाल तर आलिया सध्या ‘राजी’ या चित्रपटात बिझी आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित हा चित्रपट धर्मा प्रॉडक्शन प्रोड्यूस करतो आहे. यात ती विकी कौशलसोबत दिसणार आहे.  ‘राजी’मध्ये आलिया एका काश्मीरी मुलीची भूमिका साकारणार आहे. जिचा विवाह पकिस्तानी लष्कर अधिकाºयाशी होतो. 1971साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान आलिया भारतातील गुप्त माहिती पाकिस्तानी अधिकाºयांना देते, असे याचे कथानक आहे. हा चित्रपट हरिंदर सिक्का यांच्या कॉलिंग सहमत या कांदबरीवर आधारित आहे.   याऊलट वरूण ‘आॅक्टोबर’ या चित्रपटात बिझी आहे. पुढीलवर्षी एप्रिलमध्ये वरूणचा हा चित्रपट रिलीज होतो आहे.  वरूण व आलिया ही हिट जोडी करण जोहरच्या ‘सिद्दत’मध्ये दिसणार, अशीही बातमी आहे. अर्थात ही बातमी अद्याप कन्फर्म झालेली नाही

Web Title: Siddharth Malhotra is better not to work with the actor, 'Alia Bhatt!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.