श्रेयस तळपदेने ह्या अभिनेत्रीकडून घेतले बंगाली भाषेचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 12:18 PM2018-08-14T12:18:46+5:302018-08-14T12:22:04+5:30

'भैयाजी सुपरहिट' या चित्रपटातील भूमिकेसाठी श्रेयसने बंगाली भाषेचे धडे देखील गिरवले आहेत. 

Shreyas Talpade to play a Bengali writer in ‘Bhaiaji Superhit’ | श्रेयस तळपदेने ह्या अभिनेत्रीकडून घेतले बंगाली भाषेचे धडे

श्रेयस तळपदेने ह्या अभिनेत्रीकडून घेतले बंगाली भाषेचे धडे

googlenewsNext
ठळक मुद्दे'भैयाजी सुपरहिट' चित्रपट उत्तर प्रदेशमधील माफियागिरीवर आधारीत श्रेयसने सेलिना जेटलीकडून बंगाली भाषेचे धडे


मराठी व हिंदी सिनेसृष्टीत अापल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांना भुरळ पाडणारा अभिनेता श्रेयस तळपदे एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो आगामी सिनेमात बंगाली लेखकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे 'भैयाजी सुपरहिट'. या चित्रपटातील भूमिकेसाठी श्रेयसने बंगाली भाषेचे धडे देखील गिरवले आहेत. 

श्रेयसने 'भैयाजी सुपरहिट' चित्रपटासाठी बंगाली भाषेचे प्रशिक्षण त्याची जवळची मैत्रीण व अभिनेत्री सेलिना जेटलीकडून घेतले आहेत. या दोघांनी एकत्र २००९ साली पेइंग गेस्ट सिनेमात काम केले होते. दोघांच्या मैत्रीबद्दल श्रेयस म्हणाला की, ''गोलमाल रिटर्न्स' व 'पेइंग गेस्ट' चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर आम्ही चांगले मित्र झालो. माझी बायको दीप्ती व सेलिना ह्या दोघी खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. त्या दोघी एकत्र शॉपिंगलाही जातात. तसेच आम्ही एकमेकांच्या घरीदेखील जातो. जेव्हा मला कळले की सेलिना खूप चांगले बंगाली बोलते. तेव्हा मी आश्चर्यचकीत झालो आणि तिच्याकडूनच बंगाली शिकायचे ठरवले. 
सेलिना पहिली व्यक्ती आहे जिच्याकडून मी माझ्या भूमिकेसाठी भाषेचे धडे गिरवले आहेत. तिने मला बंगाली भाषेतील बारकावे शिकवली. या भूमिकेसाठी तिने मार्गदर्शन केले, असे श्रेयसने सांगितले.
'भैयाजी सुपरहिट' चित्रपटाची कथा उत्तर प्रदेशमधील माफियागिरीवर आधारीत आहे. या चित्रपटात सनी देओल दुहेरी भूमिकेत दिसणार असून तो दुहेरी भूमिकेत रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी खूप उत्सुक आहे. यात सनी देओलच्या पत्नीच्या भूमिकेत अभिनेत्री प्रीती झिंटा दिसणार आहे. श्रेयस, सनी व प्रीती यांच्यासह अमीषा पटेल, अर्शद वारसी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'भैयाजी सुपरहिट' चित्रपटाची प्रस्तुती झी स्टुडिओ करीत असून १९ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Shreyas Talpade to play a Bengali writer in ‘Bhaiaji Superhit’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.