Shocking : ‘पद्ममावती’मुळे रणवीर सिंग झाला मनोरूग्ण!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2017 07:55 AM2017-10-01T07:55:40+5:302017-10-01T15:11:53+5:30

अभिनेता रणवीर सिंग मानसिक रुग्ण झाला असे जर म्हटले तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. ...

Shocking: Ranveer Singh was a veteran of 'Padmavati'! | Shocking : ‘पद्ममावती’मुळे रणवीर सिंग झाला मनोरूग्ण!

Shocking : ‘पद्ममावती’मुळे रणवीर सिंग झाला मनोरूग्ण!

googlenewsNext
िनेता रणवीर सिंग मानसिक रुग्ण झाला असे जर म्हटले तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. त्याच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटात अल्लाउद्दीन खिलजीची भूमिका साकारताना तो मानसिक रुग्ण झाला आहे. वास्तविक रणवीर असा अभिनेता जो कोणतीही भूमिका साकारताना त्यात असा काही लीन होतो की, त्याला त्याच्या प्रकृतीचे भान उरत नाही. ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटात त्याला आजारी पडल्याचा अभिनय करायचा होता. हा सीन करण्यासाठी रणवीरने असे काही केले की, ज्यामुळे तो खरोखरच आजारी पडला. त्यानंतर त्यांने हा सीन पूर्ण केला. आता मिळालेल्या माहितीनुसार ‘पद्मावती’ या चित्रपटातील भूमिकेसाठीही त्याने असेच काही केल्याने तो मानसिक आजाराचा सामना करीत आहे. होय, ‘फर्स्ट पोस्ट’ पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, रणवीर सिंगच्या मित्रांनी त्याला मानसोपचार तज्ज्ञाला भेटण्याचा सल्ला दिला आहे. 

‘पद्ममावती’ या चित्रपटात अतिशय गंभीर आणि उग्र स्वरूपाची भूमिका अल्लाउद्दीन खिलजी अर्थात रणवीरची आहे. ही भूमिका साकारण्यासाठी रणवीर स्वत:ला ऐवढा गंभीर ठेवत आहे की, तो हसणे आणि बोलणे जणू काही विसरलाच आहे. रणवीरने स्वत:ला त्याच्या फ्लॅटमध्ये बरेच दिवस बंद करून ठेवले होते. हे करण्यामागचे कारण म्हणजे त्याला कोणी भेटू नये अन् त्याच्यात अधिक गंभीरता यावी याकरिताच त्याने हा उपद्व्याप केला. ऐवढेच काय तर रणवीर शूटिंग करतानाही कोणाशी बोलत नव्हता अशी माहिती समोर येत आहे. शूटिंग संपल्यानंतर तो विचार करीत बाहेर पडत असायचा.



शिवाय या सगळ्यांपासून काहीशी उसंती मिळविण्यासाठी त्याने एक लक्झरी कार खरेदी केली, ही कार घेऊन तो एकटाच सुट्या एन्जॉय करायला बाहेर पडायचा. रणवीरची ही हालत खरोखरच गंभीर असून, आता तो मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेण्याच्या विचारात आहे. असो, संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट १ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटात राणी पद्मावतींच्या भूमिकेत दीपिका पादुकोण असून, राजा रतन सिंहच्या भूमिका शाहिद कपूर साकारत आहे. 

दरम्यान, शाहिद आणि दीपिकाच्या भूमिकांचे फर्स्ट लूक समोर आले असून, रणवीरचा लूक खूपच सिक्रेट ठेवण्यात आला आहे. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की, त्याची भूमिका कशा स्वरूपाची असेल. 

Web Title: Shocking: Ranveer Singh was a veteran of 'Padmavati'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.