हॉलिवूडमध्ये दिसणार शाहरुख खान ?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2017 11:26 AM2017-02-21T11:26:20+5:302017-02-21T16:56:20+5:30

प्रियांका चोप्रा आणि निमरत कौरनंतर बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान आपल्याला लवकरच अमेरिकेतील एका टीव्हीमध्ये दिसणार आहे. अमेरिकेतल्या ...

Shahrukh Khan to appear in Hollywood? | हॉलिवूडमध्ये दिसणार शाहरुख खान ?

हॉलिवूडमध्ये दिसणार शाहरुख खान ?

googlenewsNext
रियांका चोप्रा आणि निमरत कौरनंतर बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान आपल्याला लवकरच अमेरिकेतील एका टीव्हीमध्ये दिसणार आहे. अमेरिकेतल्या साइंस फिक्शन डिटेक्टिव शो 'डर्क जेंटलीस होलिस्टिक डिटेक्टिव एजेंसी'च्या दुसऱ्या सीजनमध्ये शाहरुखला आमंत्रित करण्यात आले आहे. शाहरुख खान हे आमंत्रण स्वीकारत स्वत:च्या खर्चाने तिकडे येण्याचे मान्य केले आहे. 
बीबीसी चॅनेलवर प्रसारित होणारी ही मालिका डगलस एडम्सवर या कादबंरीवर आधारित आहे. यात अदृश्य शक्तिंच्या सहाय्याने केस उलगडल्या जातात. शाहरुखला या शोचा हिस्सा बनण्याचे आमंत्रण मोठ्या इंटरेस्टिंग पद्धतीने मिळाले आहे. 
शाहरुखने डिर्क जेंटलीबद्दल ट्विटर पोस्ट शेअर करत लिहिले यात त्यांने मला या शोबद्दल काहीच माहिती नसल्याचे सांगितले आहे. आपल्या अज्ञानतेबाबत शोच्या एक्झिक्युटीव्ह प्रोड्यूसर अरविंद एथान डेविडची शाहरुखने माफी मागितली आहे. याच उत्तर देताना अरविंद एथान डेविडने शाहरुखला या शोमध्ये येण्याचे निमंत्रण दिले. याशिवाय सीजन-2 मध्ये शाहरुखला केमियो रोल ऑफर केला आहे आणि शाहरुखने हा रोल स्वीकारला ही आहे. बाहुबली2मध्ये ही शाहरुख किमिओ रोल करणार अशी चर्चा होती. मात्र त्यानंतर ती केवळ अफवा असल्याचेसमोर आले. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधली कलाकारांना हॉलिवूडचे वेध लागल्याचे दिसतंय. प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोण यादोघी ही हॉलिवूडमध्ये रमल्या होता. प्रियांका चोप्रा अजूनही क्वांटिको या मालिकेत व्यस्त आहे. त्यामुळे त्याच्या पावलावर पाऊल टाकत शाहरुख खानन ही आता हॉलिवूडच्या वाटेवर निघाला आहे. काहि दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या शाहरुखच्या रईस चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गला जमावला होता.      

Web Title: Shahrukh Khan to appear in Hollywood?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.