शाहिद कपूरवर का नाराज झाली होती विद्या बालन?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 09:15 AM2017-09-25T09:15:20+5:302017-09-25T14:45:20+5:30

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि करिना कपूर खानच्या लव्ह लाईफने जेवढी चर्चेत होती. तसेच शाहिदचे नाव प्रियांका चोप्रासोबत सुद्धा ...

Shahid Kapoor was upset with Vidya Balan? | शाहिद कपूरवर का नाराज झाली होती विद्या बालन?

शाहिद कपूरवर का नाराज झाली होती विद्या बालन?

googlenewsNext
लिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि करिना कपूर खानच्या लव्ह लाईफने जेवढी चर्चेत होती. तसेच शाहिदचे नाव प्रियांका चोप्रासोबत सुद्धा जोडले गेले. पण खूप कमी लोकांना शाहिद आणि विद्या बालनच्या नात्याबाबत माहिती आहे. 2008मध्ये आलेल्या किस्मत कनेक्शन चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघांची ओळख झाली होती. करिना कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर त्यावेळी शाहिद कपूर सिंगल होता. चित्रपटाची शूटिंग कॅनडामध्ये सुरु होती त्यादरम्यान दोघे एकमेकांच्या जवळ आले होते. शूटिंग संपल्यानंतर भारतात परतल्यानंतर अनेक वेळा दोघांना डिनर डेटवर एकत्र पाहण्यात आले होते. दोघांनी मात्र आपल्या फक्त एकमेंकाचे चांगले मित्र असल्याचे सांगत ही गोष्ट नेहमीच टाळली. मात्र दोघांचे नाते ही फार काळ टिकले नाही लवकरच दोघांचे रस्ते ही वेगळे झाले.  
   
ब्रेकअप मागचे नक्की कारण समजू शकले नाही. मात्र एका इंटरव्ह्यु दरम्यान विद्या बालन शाहिदचे नाव घेतल्याशिवाय शाहिद स्वत:ला जास्त स्मार्ट समझत असल्याचे म्हणाली होती. छोट्या -छोट्या गोष्टी तो तणात असल्याचे तिने म्हटले होते. आता व्यक्ती नक्की शाहिद होता की आणखीन कोणी हे फक्त विद्या बालनच सांगू शकते.   
विद्या आणि शाहिदचा किस्मत कनेक्शन बॉक्स ऑफिसवर काही फारशी कमाल दाखवू शकला नव्हता. मात्र दोघांची जोडी ऑनस्क्रिन प्रेक्षकांना आवडली होती. कधी एकमेंकासोबत डिनर डेटवर जाणारे शाहिद आणि विद्या आज एकमेकांच्या समोर येणं ही टाळतात.  

ALSO READ :  Padmavati New Posters : सावधान...महारावल रतन सिंह पधार चुके है!

शाहिद कपूरचा आगामी चित्रपट सध्या पद्मावती सध्या खूप चर्चेत आहे. आजच पद्मावतीमधला  चित्तौडचा राजा रावल रत्न सिंगचा लूक लाँच करण्यात आले आहे. तो यात राणी पद्मावतीच्या पतीची भूमिका साकारतो आहे. पद्मावतीची भूमिका दीपिका पादुकोण साकारणार आहे. तर रणवीर सिंग अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत झळकणार आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हा चित्रपट या आधी नोव्हेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र आता तो 1 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाला दीपिका पादुकोणचा लूक चांगलाच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. 

Web Title: Shahid Kapoor was upset with Vidya Balan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.