आमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खानमध्ये शाहरुख अधिक जवळचाः अनुष्का शर्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2017 02:02 PM2017-03-20T14:02:14+5:302017-03-20T19:32:14+5:30

अनुष्का शर्माने रब ने बना दी जोडी, जब तक है जान, सुलतान, पीके यांसारख्या अनेक हिट चित्रपटात काम केले ...

Shah Rukh is more in Aamir Khan, Salman Khan and Shah Rukh Khan: Anushka Sharma | आमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खानमध्ये शाहरुख अधिक जवळचाः अनुष्का शर्मा

आमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खानमध्ये शाहरुख अधिक जवळचाः अनुष्का शर्मा

googlenewsNext
ुष्का शर्माने रब ने बना दी जोडी, जब तक है जान, सुलतान, पीके यांसारख्या अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. त्याचसोबत तिने एनएच10 सारख्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आता फिल्लोरी या तिच्या आगामी चित्रपटाची निर्मिती करण्यासोबतच या चित्रपटात तिने प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाबाबत तिच्याशी मारलेल्या गप्पा...

फिल्लोरी या चित्रपटात तू भूताची भूमिका साकारत आहेस, तुझा स्वतःचा भूतावर विश्वास आहे का?
अनेकवेळा लहान मुलांना त्यांचे आई-वडील अथवा घरातील मोठी मंडळी भूताच्या कथा सांगतात. पण मी लहानपणी माझ्या पालकांकडून कधीच भूताच्या कथा ऐकल्या नाहीत. पण भूत असते असे मी अनेकांकडून ऐकले आहे. एखादी शक्ती असते असे अनेकजण म्हणतात. पण याचा अनुभव मला कधीच आलेला नाही.

फिल्लोरी या चित्रपटाची तू निर्मिती करत असताना या चित्रपटातील मुख्य भूमिका तू साकारावी असा विचार कसा केलास?
मला देवाच्या कृपने अनेक चित्रपट मिळत असल्याने आमचे प्रोडक्शन हाऊस हे मी चित्रपटात काम करावे यासाठी बनवले गेलेले नाहीये असे माझा भाऊ नेहमी बोलतो. पण जर एखाद्या भूमिकेसाठी मी योग्य असेन आणि मी आज एक आघाडीची अभिनेत्री आहे. त्यामुळे इतर कोणत्या नायिकेने काम करण्याऐवजी मी चित्रपटात काम का करू नये असा विचार आम्ही केला. आणि त्यामुळेच मी या चित्रपटात काम करण्याचे ठरवले. तसेच या भूमिकेसाठी मी योग्य आहे असे या चित्रपटाचे दिग्दर्शक अनशाई लाल यांचे म्हणणे होते. भविष्यात एखाद्या भूमिकेत मी योग्य नसल्यास माझ्याऐवजी दुसरी अभिनेत्री तुम्हाला माझ्या होम प्रोडक्शनमध्ये नक्कीच पाहायला मिळेल.

तुझ्या चित्रपटाचे नाव फिल्लोरी असे का ठेवण्यात आले?
पंजाबमध्ये फिल्लोर हे एक ठिकाण आहे. तेथील लोक स्वतःला फिल्लोरी असे म्हणतात. माझ्या चित्रपटाच्या कथेत या ठिकाणचा संदर्भ असल्याने या चित्रपटाचे नाव फिल्लोरी असे ठेवण्यात आले.


तू हिंदी चित्रपटाची निर्मिती केली आहेस, यानंतर मराठी चित्रपटांच्या निर्मितीचा काही विचार आहे का?
सध्या मराठीत एकापेक्षा एक चांगल्या कथा पाहायला मिळत आहेत. सैराट आणि फ्रँडी या चित्रपटांविषयी मी खूप काही ऐकले आहे. पण हे चित्रपट पाहाण्याची मला संधी मिळालेली नाही. पण माझ्या भावाला अनेक मराठी चित्रपट आवडतात. प्रादेशिक सिनेमात सध्या चांगल्या कथा पाहायला मिळत आहेत. त्यामुळे चांगली कथा आणि योग्य संधी असल्यास मी मराठी चित्रपटांची निर्मिती नक्कीच करेन. 

तू निर्मिती करत असलेल्या चित्रपटांची कथा नेहमीच हटके असते, याचे काही विशेष कारण आहे का?
आम्ही आमच्या प्रोडक्शन हाऊस तर्फे खूप वेगळे चित्रपट बनवण्याचे ठरवले आहे. खरे तर लोकांना तेच तेच पाहून कंटाळा आला आहे. त्यामुळे पुढील काळातही आमच्या चित्रपटांच्या कथा या हटकेच असणार आहेत. कोणताही चित्रपट करत असताना तुम्हाला मजा आली पाहिजे असे मला वाटते.

चित्रपटांपेक्षा आजकाल प्रमोशनला अधिक अधिक वेळ जातो असे तुला वाटते का? फिल्लोरी या चित्रपटाचे प्रमोशन तुम्ही खूप वेगळ्या पद्धतीने केले आहे. त्याबाबत काय सांगशील?
आजच्या काळाच चित्रपटाचे प्रमोशन करणे हे चित्रपटाचे चित्रीकरण करण्यापेक्षा कठीण झाले आहे असे मला वाटते. तरीही मी चित्रीकरणासोबतच चित्रपटाचे प्रमोशन करणेदेखील एन्जॉय करते. या चित्रपटात मी एका भूताच्या भूमिकेत असल्याने हे भूत कधी, कुठेही असू शकते असा विचार करून आम्ही फोटोशॉपद्वारे मला अनेक जुन्या फोटोमध्ये टाकले आणि लोकांना आमची ही प्रमोशनची आयडिया खूप आवडली.


अनुष्का तू आमिर, सलमान आणि आमिर या तिन्ही खानांसोबत काम केले आहे. या तिघांमध्ये कोणासोबत काम करण्याचा अनुभव अधिक चांगला आहे?
मी शाहरुखसोबत माझा पहिला चित्रपट केला आहे. त्यानंतर जब तक है जान या चित्रपटात मी त्याच्यासोबत काम केले आणि आता इम्तियाज अलीच्या चित्रपटातदेखील मी त्याच्यासोबत झळकणार आहे. माझ्या पहिल्या चित्रपटाच्यावेळी तर त्याने मला खूप समजून घेतले होते. एखाद्या शिक्षकाप्रमाणे त्याने मला अनेक गोष्टी शिकवल्या. त्यामुळे त्याच्यासोबत माझे एक वेगळे बाँडिंग आहे.





Web Title: Shah Rukh is more in Aamir Khan, Salman Khan and Shah Rukh Khan: Anushka Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.