SEE PICS: असा आहे जॉन अब्राहमचा मुंबईमधील आलिशान आशियाना!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 04:23 PM2018-08-14T16:23:46+5:302018-08-14T16:44:34+5:30

सोशल मीडियावर शाहरूख,सलमान यांच्या घरांचे फोटो व्हायरल होतात आता जॉन अब्राहमच्याही घराचे फोटो व्हायरल होत असून सा-यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

SEE PICS: John Abraham’s Penthouse Home In Mumbai | SEE PICS: असा आहे जॉन अब्राहमचा मुंबईमधील आलिशान आशियाना!

SEE PICS: असा आहे जॉन अब्राहमचा मुंबईमधील आलिशान आशियाना!

googlenewsNext

आपलं स्वप्नातलं घर खास असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं.हे स्वप्नपूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण झटत असतो.प्रत्येकाच्या स्वप्नातील घराच्या कल्पना या वेगवेगळ्या असतात.त्या दृष्टीने आपल्या स्वप्नातलं घर घडवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती मेहनत करत असतो.याला कलाकार मंडळीही अपवाद नसतात. आजपर्यंत अनेकदा बॉलिवूड कलाकारांचे आलिशान घराचे बाहेरील आणि आतील छायाचित्रे अनेकदा समोर आली आहेत.आता जॉन अब्राहमच्या घराचे आतील छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.बांद्रा येथील बँड स्टॅड एरियामध्ये जॉन अब्राहमचे आलिशान लॅव्हिश डुप्लेक्स फ्लॅट आहे. 5000 चौरस फुट दोन मजली डुप्लेक्स फ्लॅट आहे. बेडरूम, लिविंग एरिया,किचन एरियाचे इंटेरिअरही खास पद्धतीने डिझाईन करण्यात आले आहे.नेहमीच सोशल मीडियावर शाहरूख,सलमान यांच्या घरांचे फोटो व्हायरल होतात आता जॉन अब्राहमच्याही घराचे फोटो व्हायरल होत असून सा-यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

.

काही दिवसांपूर्वी पूर्वी आम्ही तुम्हाला सांगितले होते की आमीर खानच्या 'सरफरोश' सिनेमाचा सिक्वेल तयार करण्यात येणार आहे. जॉन म्हैथ्यू दिग्दर्शित हा सिनेमा १९९९ला  प्रदर्शित झाला होता. आमिर खान, सोनाली बेंद्रे आणि नासरुद्दीन शाह यांच्या या सिनेमातील अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते, सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. आता तब्बल १९ वर्षांनंतर ह्या सिनेमाच्या सिक्वेलची तयारी सुरु झाली आहे आणि ह्या सिनेमात आमिर खानची भूमिका जॉन अब्राहिम साकारणार आहे आणि हे स्वतः जॉन ने सांगितले आहे.

ह्या सिनेमात आमिर खानची भूमिका साकारण्याबाबत जॉनला विचारले असता तो म्हणाला "मी फार उत्साहित आहे मी आमिर खानचा चाहता आहे त्यांची भूमिका करणे माझ्यासाठी आव्हानच आहे पण ह्या सिनेमाची लय एकच आहे जी 'सत्यमेव जयते' आहे.  जॉनने या वर्षी परमाणू सारखे चांगले सिनेमा तयार केला. त्याचबरोबर येत्या १५ ऑगस्टला जॉन चा 'सत्यमेव जयते' सिनेमा प्रदर्शित होत आहे. ह्याव्यतिरिक्त जॉनकडे अजून दोन सिनेमा आहेत ते म्हणजे  "बाटला हाऊस आणि रॉ : रोमिओ अकबर वॉल्टर. हे सगळे सिनेमा अॅक्शनने भरलेले आहेत. रॉमध्ये तर जॉन आहे गुप्तहेर साकारत आहे त्यामुळे तो वेगवेगळ्या रुपात दिसणार आहे.


 

Web Title: SEE PICS: John Abraham’s Penthouse Home In Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.