‘पीएम नरेंद्र मोदी’: सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा, आता चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टात!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 01:57 PM2019-04-09T13:57:12+5:302019-04-09T13:57:55+5:30

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या केंद्रस्थानी असलेला ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

SC dismisses plea of Cong activist seeking stay on release of biopic on PM Narendra Modi | ‘पीएम नरेंद्र मोदी’: सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा, आता चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टात!!

‘पीएम नरेंद्र मोदी’: सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा, आता चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टात!!

googlenewsNext
ठळक मुद्दे‘पीएम नरेंद्र मोदी’ हे बायोपिक दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी दिग्दर्शित केले आहे. विवेक ओबेरॉय यात नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या केंद्रस्थानी असलेला ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. आज मंगळवारी केलेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने संबंधित याचिका फेटाळून लावली. अद्याप हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडून पास झालेला नाही. त्यामुळे चित्रपटासंदर्भात हस्तक्षेप करणे घाईचे ठरेल. ‘पीएम नरेंद्र मोदी’ येत्या ११ एप्रिलला प्रदर्शित झाल्यास आचारसंहितेचे उल्लंघन ठरेल काय? याचा निर्णय निवडणूक आयोग घेईल, असे सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावताना स्पष्ट केले. त्यामुळे हा चित्रपट येत्या ११ एप्रिलला रिलीज होतो की नाही, हा सस्पेन्स कायम आहे.


यापूर्वी दोनदा ‘पीएम नरेंद्र मोदी’ची रिलीज डेट बदलण्यात आली. आधी हा चित्रपट १२ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. यानंतर ५ एप्रिल चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण ऐन रिलीजच्या तोंडावर मेकर्सनी ही तारीख बदलून ११ एप्रिल ही रिलीज डेट निश्चित केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षांनी या चित्रपटाला विरोध केला आहे. ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महिमामंडन करणारा चित्रपट आहे, यामुळे मतदार प्रभावित होऊ शकतात, असे या राजकीय पक्षांचे मत आहे.
यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अर्थात मनसेने या चित्रपटावरून सेन्सॉर बोर्डाचे प्रमुख प्रसून जोशी यांचा राजीनामा मागितला होता. निर्माता रिलीज डेटच्या ५८ दिवसांआधी सेन्सॉर बोर्डाकडे चित्रपटाची फायनल कॉपी पाठवतात. अशात ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाला कुठल्या आधारावर विशेष वागणूक देण्यात आली? असा सवाल मनसेने उपस्थित केला होता.
‘पीएम नरेंद्र मोदी’ हे बायोपिक दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी दिग्दर्शित केले आहे. विवेक ओबेरॉय यात नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

Web Title: SC dismisses plea of Cong activist seeking stay on release of biopic on PM Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.