'सत्यमेव जयते'चा येणार सीक्‍वल?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 08:00 AM2018-11-17T08:00:00+5:302018-11-17T08:00:00+5:30

'सत्यमेव जयते' चित्रपटातील टीम चित्रपटाचे दिग्दर्शक मिलाप झवेरी यांच्या वाढदिवसानिमित्त एकत्रित आली होती.

Satyamev Jayate's sequel? | 'सत्यमेव जयते'चा येणार सीक्‍वल?

'सत्यमेव जयते'चा येणार सीक्‍वल?

googlenewsNext

बॉलिवूडमधील अॅक्‍शन हिरो जॉन अब्राहमचा 'सत्यमेव जयते' चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट 
बॉक्‍स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातील टीम चित्रपटाचे दिग्दर्शक मिलाप झवेरी यांच्या वाढदिवसानिमित्त एकत्रित आली होती. मिलाप झवेरी यांच्या वाढदिवसानिमित्त जॉन अब्राहम, भूषण कुमार, निखिल आडवाणी, नोरा फतेहीसह अनेक कलाकार उपस्थित होते. मिलाप झवेरी यांच्या वाढदिवसानिमित्त जॉन अब्राहम, भूषण कुमार, निखिल आडवाणी, नोरा फतेहीसह अनेक कलाकार उपस्थित होते. 'सत्यमेव जयते'ची टीम एकत्रित आल्याने लवकरच या चित्रपटाच्या सीक्‍वलची घोषणा होण्याची शक्‍यता असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

मिलाप झवेरी यांच्या दिग्दर्शनाखालील 'सत्यमेव जयते'ला भूषण कुमार आणि निखिल आडवाणी यांनी प्रोड्यूस केले होते. या चित्रपटातील सर्वोत्कृष्ट संवाद आणि जबरदस्त अॅक्‍शन-थ्रिलरमुळे प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. नव्वदच्या दशकाला अनुरूप या चित्रपटात जॉन अब्राहम आणि आयशा शर्मा यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटातून आयशाने बॉलिवूडमध्ये यशस्वीपणे पर्दापण केले होते.

दरम्यान, जॉन अब्राहम सध्या आपल्या आगामी 'बाटला हाउस' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. १३ सप्टेंबर २००८ साली दिल्लीतील करोल बाग, कनाट प्लेस, इंडिया गेट व ग्रेटर कैलाश येथे एकापाठोपाठ एक बॉम्बस्फोट झाले होते. या दुर्घटनेत २६ लोक मृत्यूमुखी पडले होते व १३३ लोक जखमी झाले होते. दिल्ली पोलिसांनी या बॉम्बस्फोटोसाठी दहशतवादी संघटना इंडियान मुजाहिद्दीनला जबाबदार धरले होते. या घटनेच्या सहा दिवसानंतर १९ सप्टेंबरला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची सूचना मिळाली होती की इंडियन मुजाहिद्दीन संघटनेटे पाच आंतकवादी बाटला हाऊसमधील एका घरात राहत आहेत. 'बाटला हाऊस' चित्रपट १५ ऑगस्ट, २०१९ला प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Satyamev Jayate's sequel?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.