सारा अली खानला या कारणामुळे कोसळले होते रडू, आईच्या एका सल्ल्याने तिचा झाला कायापालट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 06:00 AM2018-12-13T06:00:00+5:302018-12-13T06:00:00+5:30

शिक्षण पूर्ण करून अमेरिकेतून भारतात आली तोवर तिने आपला फोटोसुद्धा आईला दाखवला नव्हता असं साराने म्हटले आहे. मात्र विमानतळावर येताच आईने आपल्या सूटकेसमुळे ओळखल्याचे साराने सांगितले.

Sara Ali Khan was hit because of this reason, she was transformed into a mother's advice. | सारा अली खानला या कारणामुळे कोसळले होते रडू, आईच्या एका सल्ल्याने तिचा झाला कायापालट

सारा अली खानला या कारणामुळे कोसळले होते रडू, आईच्या एका सल्ल्याने तिचा झाला कायापालट

googlenewsNext
ठळक मुद्देसुरूवातीला साराचं वजन 96 किलो इतके होते.PCOD  म्हणजे पॉलिसिस्टीक ओवेरियल सिंड्रोम या आजाराने सारा त्रस्त आहे.फॅट टू फिट होण्याची साराची कथा तितकीच रंजक

छोटे नवाब सैफ अली खान आणि ज्येष्ठ अभिनेत्री अमृता सिंह यांची लेक सारा अली खान हिनं केदारनाथ या सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल ठेवलं आहे. आपल्या पहिल्यावहिल्या सिनेमातून सारानं आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. मात्र अभिनेत्री बनण्यापर्यंतचा तिचा प्रवास इतका सोपा नव्हता. कारण आता दिसणारी सारा आणि पूर्वीची सारा यांच्यात जमीन आस्मानाचा फरक होता. पूर्वी ती खूप लठ्ठ होती, तिचं वजनही नव्वदच्यावर होते. मात्र प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर साराने अशक्य ते शक्य करून दाखवले. फॅट टू फिट होण्याची साराची कथा तितकीच रंजक आहे.

सुरूवातीला साराचं वजन 96 किलो इतके होते. हे पाहून साराला अक्षरक्षा रडू कोसळले होते. यावेळी आपल्याला अभिनेत्री बनायचे आहे अशी इच्छाही तिने आई अमृता सिंहकडे व्यक्त केली होती. त्यावेळी अमृता सिंह म्हणजे साराच्या आईने तिला वजन कमी करण्याचा सल्ला दिला. शिक्षण लवकर पूर्ण करून तिला अभिनेत्री व्हायचं होतं म्हणून पदवीच्या दोन वर्षाचं शिक्षण तिने एका वर्षात पूर्ण केलं. त्याच दरम्यान ती अमेरिकेला गेला होती. अमेरिकेत काय काय केलं याची कथा तिने एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले.

अमेरिका असं ठिकाण आहे जिथे तुम्हाला हवं ते तुम्ही करू शकता, खाऊ शकता. कारण तिथे विविध चॉईस असतात असं सारानं सांगितलं. चॉकलेटसह तिथे सॅलड मिळते आणि पिझ्झासह प्रोटीनही मिळते. या सगळ्यांमुळेच ती अमेरिकेत असताना वाढलेले वजन कमी केले. याशिवाय वर्कआऊट आणि जीवनातील काही गोष्टी शिस्तीने फॉलो केल्याचे साराने सांगितले आहे. या सगळ्या कालावधीत आपण आपल्या आईशी म्हणजे अमृता सिंह हिच्याशी संपर्क साधला नव्हता असंही तिने आवर्जून सांगितले.

मात्र शिक्षण पूर्ण करून अमेरिकेतून भारतात आली तोवर तिने आपला फोटोसुद्धा आईला दाखवला नव्हता असं साराने म्हटले आहे. मात्र विमानतळावर येताच आईने आपल्या सूटकेसमुळे ओळखल्याचे साराने सांगितले. तीस किलो वजन कमी केल्याप्रमाणे आपण वेगळेच दिसत होतो असं साराने सांगितले. PCOD  म्हणजे पॉलिसिस्टीक ओवेरियल सिंड्रोम या आजाराने सारा त्रस्त आहे. या आजारामुळे महिलांचे वजन वाढते. हार्मोनल समस्यांमुळे आजार होत असून तो महिलांमध्ये विशेषतः लहान वयातील मुलींमध्ये होतो. 

Web Title: Sara Ali Khan was hit because of this reason, she was transformed into a mother's advice.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.