गेट वे ऑफ इंडियावर आली दंगल गर्ल सान्या मल्होत्रा ,पण तिला कुणी नाही पाहिलं ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 11:38 AM2019-03-07T11:38:16+5:302019-03-07T11:42:57+5:30

रितेश बत्रा यांचा हा सिनेमा धारावीमधल्या एका फोटोग्राफरवर आधारित आहे. या सिनेमात सान्या मल्होत्रा एका गुजराती मुलीची भूमिका साकारते आहे.

Sanya Malhotra Visited Gateway of India, But No one Saw her? | गेट वे ऑफ इंडियावर आली दंगल गर्ल सान्या मल्होत्रा ,पण तिला कुणी नाही पाहिलं ?

गेट वे ऑफ इंडियावर आली दंगल गर्ल सान्या मल्होत्रा ,पण तिला कुणी नाही पाहिलं ?

googlenewsNext

अभिनेत्री सान्या मल्होत्राने आमिर खानच्या 'दंगल' सिनेमातून आपल्या करिअरला सुरूवात केली. दंगल सिनेमातील तिच्या भूमिकेचेही विशेष कौतुक झाले होते. आता लवकरच सान्याचा 'फोटोग्राफ' सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी सान्या वेगवेगळ्या स्थळांना भेट देत आहे. नुकतेच  प्रमोशनच्या निमित्ताने मुंबईत फेरफटका मारताना दिसली. यावेळी तिने गाठलं ते गेट वे ऑफ इंडिया. सान्याने मस्त गेट वे ऑफ इंडियाची सैर केली.  गेट वे ऑफ इंडियासमोर तिने फोटोही काढले. विशेष म्हणजे संध्याकाळच्या वेळी तिथे अनेक लोक उपस्थित होते. मात्र  सान्याला तिथे कोणीच ओळखू शकलं नाही. त्याचवेळी सान्याच्या आजूबाजूला असणारे लोक आपापली मजामस्ती करण्यात दंग होते. प्रत्यक्ष गेट वेवर उपस्थित सान्याला  कोणीच ओळखू शकले नाही अशी कुजबूज सुरु झाली आहे.  

रितेश बत्रा यांचा हा सिनेमा धारावीमधल्या एका फोटोग्राफरवर आधारित आहे. या सिनेमात सान्या मल्होत्रा एका गुजराती मुलीची भूमिका साकारते आहे. सान्या दिल्लीत लहानाची मोठी झाली आहे. गुजराती मुलीची भूमिका साकारण्यासाठी तिने  भाषेवर विशेष मेहनत घेतली . सान्याला ही भूमिका साकार करण्यात कोणतीच कसर सोडायची नव्हती. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, ''फोटोग्राफ'मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत काम करणे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. कारण नवाजुद्‌दीन हा माझा आवडता अभिनेता असल्याने त्याच्यासोबत काम करण्याचे माझे स्वप्न पूर्ण होत आहे.'' 

Web Title: Sanya Malhotra Visited Gateway of India, But No one Saw her?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.