संजय दत्तची लेक त्रिशाला दत्तला भेटला स्वप्नातील राजकुमार!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 12:47 PM2019-04-17T12:47:39+5:302019-04-17T12:48:03+5:30

बॉलिवूड स्टार्स इतकेच त्यांचे कुटुंबही चर्चेत राहते. असेच एक कुटुंब म्हणजे, संजय दत्तचे कुटुंब. तूर्तास संजयची मुलगी त्रिशाला दत्त चर्चेत आहे आणि याचे कारण आह, त्रिशालाचे लव्ह लाईफ.

sanjay dutt daughter trishala date with italian | संजय दत्तची लेक त्रिशाला दत्तला भेटला स्वप्नातील राजकुमार!

संजय दत्तची लेक त्रिशाला दत्तला भेटला स्वप्नातील राजकुमार!

googlenewsNext
ठळक मुद्देत्रिशाला ही संजय दत्त आणि त्याची पहिली पत्नी ऋचा शर्मा यांची  मुलगी आहे. सध्या ती फॅशन इंडस्ट्रीमध्ये नशिब आजमावत आहे.

बॉलिवूड स्टार्स इतकेच त्यांचे कुटुंबही चर्चेत राहते. असेच एक कुटुंब म्हणजे, संजय दत्तचे कुटुंब. तूर्तास संजयची मुलगी त्रिशाला दत्त चर्चेत आहे आणि याचे कारण आह, त्रिशालाचे लव्ह लाईफ. होय, त्रिशालाच्या आयुष्यात एका राजकुमाराची एन्ट्री झालीय.  खुद्द त्रिशालाने सोशल मीडियावर याबाबत खुलासा केला आहे.
त्रिशालाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. यात फोटोत ती इटालियन पास्ता खाताना दिसतेय. आता इटालियन पास्ता आणि स्वप्नातील राजकुमार यांचा काय संबंध आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर उत्तर अगदी साधे-सोपे आहे. होय, त्रिशालाचा स्वप्नातील राजकुमारही इटालियन आहे.

आपल्या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्रिशालाने याबाबतचे संकेत दिले आहे. ‘ एका इटालियनला डेट करणे म्हणजे, खूप सारा पास्ता आणि वाईन,’ असे तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. या कॅप्शनचा अर्थ स्पष्ट आहे, तो म्हणजे संजयची लाडकी लेक एका इटालियन तरूणाला डेट करतेय. हा तरूण कोण हे अद्याप समजू शकलेले नाही. यशावकाश त्याचाही खुलासा होईल.


त्रिशाला ही संजय दत्त आणि त्याची पहिली पत्नी ऋचा शर्मा यांची  मुलगी आहे. सध्या ती फॅशन इंडस्ट्रीमध्ये नशिब आजमावत आहे. २०१४ मध्ये तिने पहिली ड्रीम ट्रेसेज हेअर एक्सटेन्शन लाइन सुरू केली होती. न्युयॉर्कमधील जॉन जे कॉलेज आॅफ क्रिमिनल जस्टिसमध्ये तिने कायद्याची पदवी घेतलीय. १९८७ मध्ये संजय दत्तने ऋचा शर्मासोबत लग्न केले होते. त्रिशालाचा जन्म १९८८ मध्ये झाला. ऋचा ब्रेन ट्यूमर हा आजार असल्याने १० डिसेंबर १९९६ मध्ये तिचे निधन झाले. आईच्या निधनानंतर त्रिशाला न्यू यॉर्कमध्ये मावशी एनासोबत राहत आहे. संजय दत्त नेहमी तिच्या संपर्कात असून, दोघांमध्ये चांगली केमिस्ट्री आहे. याशिवाय संजय दत्तची पत्नी मान्यतासोबतही तिचे चांगले संबंध आहेत.

Web Title: sanjay dutt daughter trishala date with italian

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.