असे असणार आहे सलमान खानचे मुंबईतील नवीन घर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 01:01 PM2018-12-26T13:01:32+5:302018-12-26T13:06:27+5:30

सलमानच्या घरापासूनच काही मिनिटांच्या अंतरावर सलमानचा मित्र शाहरुख खान याचा मन्नत हा बंगला आहे. शाहरुख प्रमाणे आता सलमान देखील प्रशस्त बंगला बांधणार आहे.

salman khan new home in mumbai | असे असणार आहे सलमान खानचे मुंबईतील नवीन घर

असे असणार आहे सलमान खानचे मुंबईतील नवीन घर

googlenewsNext
ठळक मुद्दे मुंबईतील गौराई येथे हे घर असणार असून या घरासाठी सलमानने गोराईत 100 एकरची जमीन घेतली असल्याची चर्चा आहे. या 100 एकरमध्ये तो त्याचा प्रशस्त बंगला बांधणार असल्याची चर्चा आहे. या घराच्या प्रत्येक गोष्टीवर सलमान बारकाईने नजर ठेवत असून हे घर कसे असणार हे देखील सलमाननेच ठरवले आहे. सलमानच्या या बंगल्यात पाच बेडरूम असून या घराचा मुख्य दरवाजा समुद्राच्या समोर उघडणार आहे.

बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानचा उद्या म्हणजेच 27 डिसेंबरला वाढदिवस असून बॉलिवूडमध्ये आज सलमानने त्याचा एक दबदबा निर्माण केला आहे. सलमानने दबंग, वाँटेड, हम आपके है कौन, एक था टायगर, बजरंगी भाईजान यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. सलमानचा चित्रपट म्हटला की, तो बॉक्स ऑफिसवर 100 करोड पेक्षा जास्त कमाई करणारा याची सगळ्यांनाच खात्री असते. सलमानची फॅन फॉलाव्हिंग तर प्रचंड आहे.  सलमान लग्न कधी करणार, सलमानच्या आयुष्यात कोण आहे याची उत्सुकता नेहमीच त्याच्या चाहत्यांना असते. 

सलमान गेल्या अनेक वर्षांपासून वांद्रेतील गॅलेक्सी अर्पाटमेंटमध्ये त्याच्या कुटुंबीयांसोबत राहातो. सलमान एक सुपरस्टार असला तरी तो एका अर्पाटमेंटमध्ये राहातो तर सलमानच्या घरापासूनच काही मिनिटांच्या अंतरावर सलमानचा मित्र शाहरुख खान याचा मन्नत हा बंगला आहे. शाहरुख प्रमाणे आता सलमान देखील प्रशस्त बंगला बांधणार आहे.

सलमान खानचे वांद्रेप्रमाणेच पनवेल येथे एक मोठे फार्म हाऊस आहे. हे फार्महाऊस 150 एकर मध्ये असून सलमान अनेक वेळा मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवण्यासाठी, रिलॅक्स होण्यासाठी त्या फार्म हाऊसवर आवर्जून जातो. 

सलमान आता मुंबईत आणखी एक घर बांधणार आहे. त्याचे हे घर वांद्रेतील त्याच्या घरापेक्षा खूपच मोठे असणार आहे. मुंबईतील गौराई येथे हे घर असणार असून या घरासाठी सलमानने गोराईत 100 एकरची जमीन घेतली असल्याची चर्चा आहे. या 100 एकरमध्ये तो त्याचा प्रशस्त बंगला बांधणार असल्याची चर्चा आहे. या घराच्या प्रत्येक गोष्टीवर सलमान बारकाईने नजर ठेवत असून हे घर कसे असणार हे देखील सलमाननेच ठरवले आहे. सलमानच्या या बंगल्यात पाच बेडरूम असून या घराचा मुख्य दरवाजा समुद्राच्या समोर उघडणार आहे. हे घर लवकरात लवकर बांधले जाणार असल्याचे म्हटले जात आहे. सलमानला बाइकिंगचे प्रचंड वेड असल्याचे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे सलमानला बाईक चालण्यासाठी या बंगल्याच्या आवारात भली मोठी जागा देखील असणार आहे. 
 

Web Title: salman khan new home in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.