OMG! सलमान खानच्या नावावर सुरु होती ठगबाजी; भाईजानने वेळीच केले सावध!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 10:16 AM2019-05-03T10:16:19+5:302019-05-03T10:17:44+5:30

आजुबाजूला सुरु असलेली ठगबाजी, फसवणुकीच्या प्रकारांपासून बॉलिवूड सेलिब्रिटींना कायम सतर्क राहावे लागते. अनेक लोक, अनेक समूह बॉलिवूड सेलिब्रिटींच्या नावावर ठगबाजी करतात. फसवणुकीचे अनेक प्रकार यातून समोर येतात. असेच एक प्रकरण तूर्तास उघड झाले आहे.

salman khan cleared about false news of charity show event | OMG! सलमान खानच्या नावावर सुरु होती ठगबाजी; भाईजानने वेळीच केले सावध!!

OMG! सलमान खानच्या नावावर सुरु होती ठगबाजी; भाईजानने वेळीच केले सावध!!

googlenewsNext
ठळक मुद्देतूर्तास सलमान खानचा ‘भारत’ हा सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.

आजुबाजूला सुरु असलेली ठगबाजी, फसवणुकीच्या प्रकारांपासून बॉलिवूड सेलिब्रिटींना कायम सतर्क राहावे लागते. अनेक लोक, अनेक समूह बॉलिवूड सेलिब्रिटींच्या नावावर ठगबाजी करतात. फसवणुकीचे अनेक प्रकार यातून समोर येतात. असेच एक प्रकरण तूर्तास उघड झाले आहे. विशेष म्हणजे, खुद्द बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खान याच्या नावाने फसवणुकीचा हा प्रकार सुरु होता. पण भाईजान वेळीच सावध झाला आणि त्याने याबद्दल आपल्या चाहत्यांना सतर्क केले.
होय, भाईजान सलमानने आपल्या सोशल अकाऊंटवर एका इव्हेंटचे बॅनर शेअर केले आहे. या बॅनरवर सलमानशिवाय आणखी काही बॉलिवूड सेलिब्रिटींचे फोटो आहेत. हा इव्हेंट सलमानच्या बीइंग ह्यूमन फाऊंडेशनद्वारे आयोजित केला जात असल्याचा दावा  या बॅनरमध्ये करण्यात आला आहे. एवढेच नाही तर खुद्द सलमान या इव्हेंटला हजर राहणार असल्याचा दावाही यात केला गेला आहे.




सलमानने या इव्हेंटचे पोस्टर आपल्या अधिकृत  ट्विटर  हँडलवर शेअर करत, असा कुठलाही इव्हेंट नसल्याचा खुलासा केला आहे. मी आणि माझे बीइंग ह्यूमन अशा कुठल्याही इव्हेंटमध्ये सहभागी नाही, असे सलमानने लिहिले.
सलमानच्या नावावर सुरु असलेली ही ठगबाजी उत्तर प्रदेशच्या बिजनौर येथे सुरु होती. सलमानच्या नावावर चाहत्यांकडून पैसे उकळले जात होते. विशेष म्हणजे, एका वृत्तपत्रात या इव्हेंटची जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. वेळीच हा प्रकार सलमानच्या लक्षात आला आणि हजारो चाहत्यांची फसवणूक टळली, असे म्हणायला हरकत नाही.




तूर्तास सलमान खानचा ‘भारत’ हा सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. याशिवाय ‘दबंग 3’मध्ये तो बिझी आहे. हा सिनेमा हातावेगळा करताच संजय लीला भन्साळींच्या ‘इंशाअल्लाह’चे शूटींग सुरु करणार आहे.

Web Title: salman khan cleared about false news of charity show event

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.