​सलीम खान म्हणतात, मी सलमानसाठी कुठलीच स्क्रिप्ट लिहिणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2017 09:39 AM2017-03-24T09:39:25+5:302017-03-24T15:09:25+5:30

बॉलिवूडमध्ये सध्या असा कुठलाही दिग्दर्शक नसेल, जो सलमान खानसोबत चित्रपट बनवू इच्छित नसेल. कदाचितच अशी अभिनेत्री असेल ती सलमानची ...

Salim Khan says, I will not write any script for Salman | ​सलीम खान म्हणतात, मी सलमानसाठी कुठलीच स्क्रिप्ट लिहिणार नाही

​सलीम खान म्हणतात, मी सलमानसाठी कुठलीच स्क्रिप्ट लिहिणार नाही

googlenewsNext
लिवूडमध्ये सध्या असा कुठलाही दिग्दर्शक नसेल, जो सलमान खानसोबत चित्रपट बनवू इच्छित नसेल. कदाचितच अशी अभिनेत्री असेल ती सलमानची हिरोईन बनू इच्छित नसेल आणि कदाचितच असा लेखक असेल जो, सलमानसाठी लिहू इच्छित नसेल. अर्थात कुठल्याही गोष्टीला अपवाद असतातच. सलमानचे पिता सलीम खान हेही यापैकीच एक़ मी सलमानसाठी स्क्रिप्ट लिहिणार नाही, असे सलीम खान यांनी अलीकडे एका मुलाखतीत म्हटले. त्यांनी सांगितले की, आज मी एखादी स्क्रिप्ट घेऊन कुठल्याही अभिनेत्याजवळ जातो तेव्हा मला एकच प्रश्न विचारला जातो. तो म्हणजे, तुमची स्क्रिप्ट इतकी चांगली आहे तर मग सलमानला घेऊन चित्रपट का बनवत नाही? या प्रश्नावर मी, सलमानसाठी अजिबात स्क्रिप्ट लिहिणार नाही,असे स्पष्टपणे सांगतो.  साहजिक यामागचे कारणही मला विचारले जाते. मी कारणही सांगतो. कारण, मी सलमानसाठी स्क्रिप्ट लिहिली आणि चित्रपट फ्लॉप झाला तर माझ्या वडिलांनी मला फ्लॉप केले, असे सलमान म्हणेल. याऊलट चित्रपट हिट झाला तर सगळे क्रेडिट एकटा सलमान घेऊन जाईल. चित्रपट त्याच्याचमुळे हिट झाला, असे लोक म्हणतील.

ALSO READ : OMG!! ​सलमान खानने का कमी केले १७ किलो वजन?

जावेद अख्तरसोबत मिळून सलीम अली यांनी बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. यात ‘जंजीर’,‘दीवार’,‘त्रिशूल’,‘काला पत्थर’,‘मिस्टर इंडिया’ अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. या चित्रपटांची स्क्रिप्ट अर्थात पटकथा सलीम व जावेद यांनी लिहिलीयं.  अलीकडे सलीम खान फार पटकथा लिहित नाहीत. याऊलट त्यांचा मुलगा सलमान आहे. सलमानच्या चित्रपटाची रांग संपता संपत नाही. लवकरच सलमान खानचा ‘ट्युबलाईट’ रिलीज होतो आहे. सध्या तो ‘टायगर जिंदा है’मध्ये बिझी आहे. यानंतर ‘दबंग3’,‘किक2’,‘धूम4’ याशिवाय रेमो डिसूजा असे अनेक चित्रपट सलमानची प्रतीक्षा करत आहेत.

Web Title: Salim Khan says, I will not write any script for Salman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.