लव्ह आज कलच्या सिक्वलमध्ये काम करण्याविषयी सैफ अली खान सांगतो...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 09:00 PM2019-04-08T21:00:00+5:302019-04-08T21:00:02+5:30

लव्ह आज कल या चित्रपटाच्या सिक्वलचा सैफ अली खान देखील भाग असणार असल्याची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा आहे.

Saif Ali Khan not part of the Love Aaj Kal sequel! | लव्ह आज कलच्या सिक्वलमध्ये काम करण्याविषयी सैफ अली खान सांगतो...

लव्ह आज कलच्या सिक्वलमध्ये काम करण्याविषयी सैफ अली खान सांगतो...

googlenewsNext
ठळक मुद्देसैफ सांगतो, मला ऑफर करण्यात आलेल्या भूमिका रंजक असतील आणि काम करण्यासाठी माझ्याकडे वेळ असेल तरच मी ती भूमिका स्वीकारतो. मला इम्तियाजने लव्ह आज कल या चित्रपटाच्या सिक्वलसाठी विचारले होते. यासाठी मी त्याचे आभार मानतो. पण हा चित्रपट मी स्वीकारलेला नाहीये.

लव्ह आज कल या चित्रपटात आपल्याला दीपिका पादुकोण आणि सैफ अली खान यांची खूप छान केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. या चित्रपटातील त्या दोघांची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. या चित्रपटात ऋषी कपूर देखील महत्त्वाच्या भूमिकेत होते. हा चित्रपट त्यावेळी चांगलाच हिट झाला होता. तसेच या चित्रपटातील गाणी देखील प्रेक्षकांना भावली होती. या चित्रपटाचा रिमेक दाक्षिणात्य भाषांमध्ये बनवण्यात आला होता. आता या चित्रपटाचा सिक्वल प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून विशेष म्हणजे सैफ अली खानची मुलगी सारा अली खानच या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

लव्ह आज काल या चित्रपटाचे दिग्दर्शन इम्तियाज अलीने केले होते आणि या चित्रपटाच्या सिक्वलच्या दिग्दर्शनाची धुरा देखील इम्तियाजनेच सांभाळली आहे. या चित्रपटाद्वारे सारा अली खान आणि कार्तिक आर्यन ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत सुरू होते. या चित्रीकरणादरम्यानचे काही फोटो देखील या चित्रपटाच्या टीमने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. पण आता दिल्लीतील चित्रीकरण संपले असून ही गोष्ट सारानेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या फॅन्सना सांगितली होती. 

लव्ह आज कल या चित्रपटाच्या सिक्वलचा सैफ अली खान देखील भाग असणार असल्याची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. सैफ कार्तिक आर्यनच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा होती. पण या सगळ्या केवळ अफवा असल्याचे खुद्द सैफनेच सांगितले आहे. सैफ सध्या सेक्रेड गेम्स २ चे चित्रीकरण करत आहे. त्यासोबतच तानाजी, बुथ पोलिस, हंटर आणि जवानी जानेमन हे चार चित्रपट त्याने साईन केले असून त्यावर तो काम करत आहे. त्यामुळे त्याच्याकडे सध्या तरी कोणत्याही नवीन प्रोजेक्ट्साठी वेळ नाहीये. याविषयी सैफ सांगतो, मला ऑफर करण्यात आलेल्या भूमिका रंजक असतील आणि काम करण्यासाठी माझ्याकडे वेळ असेल तरच मी ती भूमिका स्वीकारतो. मला इम्तियाजने लव्ह आज कल या चित्रपटाच्या सिक्वलसाठी विचारले होते. यासाठी मी त्याचे आभार मानतो. पण हा चित्रपट मी स्वीकारलेला नाहीये. मी चित्रपटात काम करतोय या केवळ अफवा आहेत. या चित्रपटात सारा मुख्य भूमिकेत असल्याने आणि ती इम्तियाजसोबत काम करत असल्याने या चित्रपटाबाबत मी खूपच उत्सुक आहे. सारा आणि कार्तिक या दोघांनाही माझ्याकडून या चित्रपटासाठी शुभेच्छा.

लव्ह आज कल या चित्रपटाच्या सिक्वलचे नाव आज कल असून हा चित्रपट 2020 च्या व्हॅलेन्टाइन डे ला प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Saif Ali Khan not part of the Love Aaj Kal sequel!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.