शाहरुख खानच्या ‘डॉन 3’बद्दल निर्मात्यांचा मोठा खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 11:47 AM2019-03-11T11:47:41+5:302019-03-11T11:49:38+5:30

अलीकडे शाहरुखने राकेश शर्माचे बायोपिक करण्यास नकार दिला. यानंतर शाहरुखचा ‘डॉन 3’ हा आगामी चित्रपटही थंडबस्त्यात गेल्याची बातमी आली. पण आता ‘डॉन 3’चे को-प्रोड्यूसर रितेश सिधवानी यांनी या चित्रपटाबद्दल नवा खुलासा केला आहे.

ritesh sidhwani finally makes an interesting revelation about shah rukh khans don 3 | शाहरुख खानच्या ‘डॉन 3’बद्दल निर्मात्यांचा मोठा खुलासा!

शाहरुख खानच्या ‘डॉन 3’बद्दल निर्मात्यांचा मोठा खुलासा!

googlenewsNext
ठळक मुद्दे‘डॉन ’ फ्रेन्चाईजीचा तिसरा चित्रपट पाहण्यास प्रत्येक जण उत्सूक आहे आणि आम्ही चाहत्यांना निराश करू इच्छित नाही,’ असे रितेश यांनी सांगितले.

किंगखान शाहरुख खानची जादू ओसरू लागलीय. केवळ शाहरुख खानच नाही तर सलमान खान ते आमिर खान सर्वांचेच चित्रपट गतवर्षी बॉक्सआॅफिसवर  कमाल दाखवू शकले नाहीत. शाहरुखचा गतवर्षी रिलीज झालेला ‘झिरो’ दणकून आपटला. या चित्रपटानंतर शाहरुखकडे एकही चित्रपट नसल्याचे म्हटले जातेय. अलीकडे शाहरुखने राकेश शर्माचे बायोपिक करण्यास नकार दिला. यानंतर शाहरुखचा ‘डॉन 3’ हा आगामी चित्रपटही थंडबस्त्यात गेल्याची बातमी आली. ‘डॉन 3’चा निर्माता फरहान सध्या त्याच्या अ‍ॅक्टिंगवर लक्ष केंद्रीत करू इच्छितो आणि त्यामुळेचं ‘डॉन 3’ थंडबस्त्यात गेल्याची चर्चा वा-यासारखी पसरली. पण आता ‘डॉन 3’चे को-प्रोड्यूसर रितेश सिधवानी यांनी या चित्रपटाबद्दल नवा खुलासा केला आहे.


होय, ‘डॉन 3’ बंद झाला नसून अद्यापही त्यावर काम सुरु असल्याचे रितेश यांनी म्हटले आहे. ‘आम्ही या चित्रपटावर काम करतोय. पण हा चित्रपट कधी बनणार, हे आम्ही सांगू शकणार नाही. ‘डॉन ’ फ्रेन्चाईजीचा तिसरा चित्रपट पाहण्यास प्रत्येक जण उत्सूक आहे आणि आम्ही चाहत्यांना निराश करू इच्छित नाही,’ असे रितेश यांनी सांगितले.


रितेश यांच्या या खुलाशानंतर एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे ‘डॉन 3’ थंडबस्त्यात गेलेला नाही. निर्माता चाहत्यांना एक धमाकेदार चित्रपट देऊ इच्छितात, कदाचित त्याचमुळे त्याच्या तयारीला वेळ लागतोय. साहजिकच यावर्षात ‘डॉन 3’ येणे नाही.   पुढच्या वर्षी या धमाकेदार चित्रपट येईल आणि शाहरूखच्या चाहत्यांसाठी सरप्राईज घेऊन येईल, अशी अपेक्षा करूयात.

Web Title: ritesh sidhwani finally makes an interesting revelation about shah rukh khans don 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.