Reema Lagoo Death Anniversary : मैंने प्यार किया या चित्रपटासाठी रिमा यांनी मागितले होते इतके पैसे, निर्मात्याने दिले हे मानधन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 07:15 AM2019-05-18T07:15:00+5:302019-05-18T07:15:01+5:30

राजश्री प्रोडक्शनच्या मैंने प्यार किया चित्रपटात रिमा लागू सलमानच्या आईच्या भूमिकेत दिसल्या होत्या.

Reema Lagoo Death Anniversary: reema lagoo got this amount for maine pyar kiya | Reema Lagoo Death Anniversary : मैंने प्यार किया या चित्रपटासाठी रिमा यांनी मागितले होते इतके पैसे, निर्मात्याने दिले हे मानधन

Reema Lagoo Death Anniversary : मैंने प्यार किया या चित्रपटासाठी रिमा यांनी मागितले होते इतके पैसे, निर्मात्याने दिले हे मानधन

googlenewsNext
ठळक मुद्देमी रात्रभर या गोष्टीचा विचार केला आणि दुसऱ्या दिवशी निर्मात्यांची भेट घेऊन मला केवळ 21 हजार द्या असे त्यांना सांगितले. त्यांच्यासाठी ही खूपच कमी रक्कम होती. त्यांनी या चित्रपटासाठी स्वतःहून मला या रक्कमेपेक्षा कित्येक पटीने अधिक रक्कम दिली. 

आपल्या दमदार अभिनयाने रंगभूमी, मालिका आणि रुपेरी पडदा गाजवणाऱ्या अभिनेत्री रिमा लागू यांच्या अकाली एक्झिटने मराठीच नाही हिंदी चित्रपटसृष्टीलाही धक्का बसला होता. बॉलिवूडमध्ये त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये साहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली. पण त्यांना प्रेमळ आईच्या भूमिकेने वेगळी ओळख मिळवून दिली. मराठीच्या बरोबरीने हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये भक्कम पाय रोऊन उभे राहणाऱ्या मोजक्या अभिनेत्रींमध्ये त्यांचा समावेश होत होता. त्यांचे निधन १८ मे २०१७ ला हृदय  विकाराच्या झटक्याने झाले. 

राजश्री प्रोडक्शनच्या मैंने प्यार किया चित्रपटात त्या सलमानच्या आईच्या भूमिकेत दिसल्या होत्या. ही भूमिका त्यांच्या करियरचा टर्निंग पॉईंट ठरली असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. कारण या रोलनंतर त्यांना आईच्या भूमिकेच्या अनेक ऑफर्स आल्या आणि आपल्या अभिनयाच्या बळावर त्यांनी त्या सर्व भूमिका यशस्वीपणे साकारल्या. 


 
रिमा लागू ऐंशी-नव्वदच्या दशकात मराठी सिनेसृष्टीत आघाडीच्या अभिनेत्री असताना त्यांना राजश्रीच्या मैंने प्यार कियामध्ये काम करण्याची ऑफर मिळाली. मराठी इंडस्ट्रीमध्ये त्यावेळी फार पैसा नव्हता. कलाकार मागेल तितके पैसा मिळेल असे ते दिवस नव्हते. सर्व काही निर्मात्याच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून होते. पण त्यावेळी हिंदीमध्ये बराच पैसा होता. कलाकाराच्या मागणीनुसार तिथे पैसा दिला जायचा. 
 


राजश्रीकडून जेव्हा रिमा लागू यांना चित्रपटात काम करायला तुम्ही किती पैसे घेणार असे विचारण्यात आले. त्यावेळी रिमा लागू यांना चांगलेच टेन्शन आले होते. रिमा यांनीच ही गोष्ट लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितली होती. त्यांनी सांगितले होते की, पैसे किती घेणार असे मराठी इंडस्ट्रीमध्ये विचारण्याची पद्धतच नव्हती. त्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांकडून मी एक दिवस मागितला. संपूर्ण दिवस पैसे किती मागायचे याचाच मी विचार करत होते. मी रात्रभर या गोष्टीचा विचार केला आणि दुसऱ्या दिवशी निर्मात्यांची भेट घेऊन मला केवळ 21 हजार द्या असे त्यांना सांगितले. त्यांच्यासाठी ही खूपच कमी रक्कम होती. हिंदी इंडस्ट्रीत किती पैसे दिले जातात हे मला माहीत नाही याची जाणीव त्यांना झाली आणि त्यांनी या चित्रपटासाठी स्वतःहून मला या रक्कमेपेक्षा कित्येक पटीने अधिक रक्कम दिली. 

Web Title: Reema Lagoo Death Anniversary: reema lagoo got this amount for maine pyar kiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.