​‘मुन्ना मायकल’मधील टायगर श्रॉफचा रापचिक अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2017 02:38 PM2017-02-16T14:38:00+5:302017-02-16T20:10:48+5:30

मायकल जॅक्सन प्रमाणे डासिंग स्टार म्हणून आपली ओळख निर्माण व्हावी यासाठी टायगर चांगलीच मेहनत घेत असल्याचे दिसते.

Rappachik Guess of Tiger Shroff in 'Munna Michael' | ​‘मुन्ना मायकल’मधील टायगर श्रॉफचा रापचिक अंदाज

​‘मुन्ना मायकल’मधील टायगर श्रॉफचा रापचिक अंदाज

googlenewsNext
लिवूडचा नवा हॅन्डसम ब्वॉय टायगर श्रॉफचा आगामी मुन्ना मायकल या चित्रपटाची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. सध्या या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असलेल्या टायगरने ‘मुन्ना मायकल’च्या सेटवरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो मायकल जॅक्सनच्या पोझमध्ये डान्स करताना दिसतो आहे. 

अभिनेता टायगर श्रॉफ याचे मोजक्याच चित्रपटात काम केले असले तरी देखील आपल्या खास डान्स स्टाईलसाठी त्याने आपली ओळख निर्माण केली आहे. अभिनेता हृतिक रोशनला आपला गुरू माणणाºया टायगरने नुकतेच लोकमतच्या महाराष्ट्राज मोस्ट स्टाईलिश अवॉर्ड सोहळ्यात हृतिक सोबत डान्स केला होता. हृतिक व मायकल जॅक्सन प्रमाणे डासिंग स्टार म्हणून आपली ओळख निर्माण व्हावी यासाठी टायगर चांगलीच मेहनत घेत असल्याचे दिसते. आपली मेहनत दाखविण्यासाठीच टायगरने आगामी‘मुन्ना मायकल’च्या सेटवरील फोटो शेअर केला आहे. ‘मुन्ना मायकल’ची अभिनेत्री निधी अग्रवाल हिने देखील आणखी एक फोटो शेअर केला असून दोघेही डान्स करताना दिसत आहेत. हा या चित्रपटातील एका गाण्याच्या शूटिंगचा फोटो असल्याचे सांगण्यात येत आहे. 



टायगर श्रॉफ हा त्याचा आगामी ‘मुन्ना मायकेल’ या चित्रपटाची शूटिंग करतो आहे. चित्रपटाचे कथानक डान्सवर आधारित असून त्याच्यासोबत सहकलाकाराच्या भूमिकेत नवाजुद्दीन सिद्दीकी हा असेल. डान्सिंग स्टार होण्यासाठी धडपडणाºया  मुन्नाची ही कथा असून त्याला मायकेल जॅक्सनप्रमाणे डान्स करता यावा असे वाटत असते. मायकेल जॅक्सनसारखे नाव माझेही व्हावे असे त्याचे स्वप्न असते. हा चित्रपट टायगरच्या करिअरसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. टायगरचा मागील चित्रपट अ फ्लार्इंग जट्ट बॉक्स आॅफिसवर तग धरू न शकल्याने टायगर कमालीचा निराश झाला होता. दरम्यान बागी हा चित्रपटाच्या सिक्वलची तयारी सुरू झाली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

">http://

Web Title: Rappachik Guess of Tiger Shroff in 'Munna Michael'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.