'ब्रह्मास्त्र'मधील गाण्याच्या डान्स प्रॅक्टिसनंतर कॅमेऱ्यात कैद झाले रणबीर कपूर व आलिया भट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 01:32 PM2018-11-10T13:32:43+5:302018-11-10T13:33:28+5:30

'ब्रह्मास्त्र' या आगामी चित्रपटात रणबीर व आलिया एकत्र झळकणार आहेत.

Ranbir Kapoor and Alia Bhat spotted after the dance practice of 'Brahmastra' | 'ब्रह्मास्त्र'मधील गाण्याच्या डान्स प्रॅक्टिसनंतर कॅमेऱ्यात कैद झाले रणबीर कपूर व आलिया भट

'ब्रह्मास्त्र'मधील गाण्याच्या डान्स प्रॅक्टिसनंतर कॅमेऱ्यात कैद झाले रणबीर कपूर व आलिया भट

ठळक मुद्देअालिया व रणबीर 'ब्रह्मास्त्र'च्या चित्रीकरणात व्यग्र

अभिनेत्री आलिया भटरणबीर कपूर यांचे रिलेशन जगजाहीर आहे. ते दोघे आगामी 'ब्रह्मास्त्र' सिनेमात एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटाचे सध्या चित्रीकरण सुरू असून यादरम्यान हे दोघे एकमेकांसोबत वेळ व्यतित करत आहेत. या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ते दोघे ब्रह्मास्त्र सिनेमातील एका गाण्याच्या डान्स प्रॅक्टिसनंतर कॅमेऱ्यात कैद झाले आणि त्यांचा हा फोटो सध्या व्हायरल होत आहे. 

सध्या अालिया व रणबीर कपूर दोघेही 'ब्रह्मास्त्र' सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहे. या चित्रपटातील एका गाण्याचा सराव करण्यासाठी रणबीर व आलिया एकत्र आले होते. त्यावेळी ते दोघे एकत्र कॅमेऱ्यात कैद झाले आणि हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या फोटोत त्यांच्या चेहऱ्यावर थकवा दिसतो आहे. आलिया व रणबीर सध्या खूप चर्चेत आहेत ते म्हणजे त्यांच्या रिलेशनशीपमुळे. त्या दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत सांगितलेले नाही. मात्र आलियाने एका मुलाखतीत ती व रणबीर एकत्र आहोत, असे सांगितले होते. हे दोघे पुढील वर्षी विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चादेखील सुरू आहे. 
'ब्रह्मास्त्र' या आगामी चित्रपटात रणबीर व आलिया एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. सोनम कपूरच्या लग्नात या दोघांना एकत्र पाहिले गेले आणि तिथूनच त्यांच्या अफेअरविषयी चर्चा सुरू झाल्या. आलिया नीतू सिंग यांनाही पसंत असल्याचेही कानावर येतेय. आलियाआधी रणबीर कॅटरिना कैफसोबत सीरिअस रिलेशनशिपमध्ये होता. पण अचानक त्यांचे ब्रेकअप झाले होते. कॅटरिनापूर्वी दीपिका पादुकोण रणबीरच्या आयुष्यात होती.

Web Title: Ranbir Kapoor and Alia Bhat spotted after the dance practice of 'Brahmastra'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.