‘ड्रामा क्विन’ राखी सावंतचा नवा ड्रामा, भडकले लोक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 11:39 AM2019-05-09T11:39:15+5:302019-05-09T11:40:29+5:30

बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आहे. ना ना उपद्व्याप करत प्रसिद्धीझोतात राहायचे ही कला राखीने चांगलीच अवगत केलीय. पण यावेळी ही ‘कला’ तिच्यावरच उलटली आणि राखी सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली.

rakhi sawant poses in pakistani flag for her new film | ‘ड्रामा क्विन’ राखी सावंतचा नवा ड्रामा, भडकले लोक

‘ड्रामा क्विन’ राखी सावंतचा नवा ड्रामा, भडकले लोक

googlenewsNext
ठळक मुद्देराखीने हे फोटो आणि व्हिडीओ शेअर केलेत आणि सोशल मीडियावर जणू संतापाची लाट आली.

बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आहे. ना ना उपद्व्याप करत प्रसिद्धीझोतात राहायचे ही कला राखीने चांगलीच अवगत केलीय. पण यावेळी ही ‘कला’ तिच्यावरच उलटली आणि राखी सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली.
राखीने तिच्या सोशल अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती पाकिस्तानच्या राष्ट्रीय ध्वजासोबत पोज देताना दिसतेय. राखीने हा फोटो शेअर केला आणि लोक भडकले. त्यांनी राखीला चांगलेच फैलावर घेतले. लोकांचा हा संताप पाहून आपले काही तरी चुकलेय, हे लगेच राखीच्या लक्षात आले आणि तिने यावर खुलासा केला. हा फोटो आपल्या आगामी चित्रपटाच्या सेटवरचा असल्याचे तिने सांगितले.


 ‘मला माझा भारत देश खूप आवडतो. पण हा माझ्या ‘धारा 370’ या चित्रपटातील एक सीन आहे,’ असे राखीने हा फोटो शेअर करताना लिहिले आहे. यासंदर्भातील एक व्हिडीओही तिने शेअर केला आहे. ‘हाय फ्रेन्ड्स, हा एक पाकिस्तानी सेटअप आहे. या चित्रपटाचे नाव ‘धारा 370’ आहे. काश्मीरी पंडितांवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात मी पाकिस्तानी मुलीची भूमिका साकारते आहे. माझा कॉस्च्युम तुम्ही बघू शकता. मी यात अतिरेकी संघटनांचा पर्दाफाश करणार आहे,’असे तिने या व्हिडीओत म्हटले आहे.


राखीने हे फोटो आणि व्हिडीओ शेअर केलेत आणि सोशल मीडियावर जणू संतापाची लाट आली. विशेष म्हणजे, पाकिस्तानीही हे पाहून भडकले. राखीचा व्हिडीओ पाहिल्यानंतर संबरीना खमीसा नामक पाकिस्तानी मुलीने   तीव्र प्रतिक्रिया दिली. ‘पाकिस्तान इस्लामला फॉलो करते आणि हा अतिशय पवित्र व शांतीप्रिय धर्र्म आहे. मला पाकिस्तानचा गर्व आहे. मला माझ्या संस्कृतीवर प्रेम आहे,’असे तिने लिहिले. या मुलीला राखीने लगेच उत्तर दिले. ‘हा माझा चित्रपट आहे. तुला आवडला नसेल तर तू माझ्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून जाऊ शकतेस,’ असे तिने सुनावले.

Web Title: rakhi sawant poses in pakistani flag for her new film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.