birthday special.... अन् राधिका आपटेचा तो ‘न्यूड सीन’ लीक झाला ...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2018 09:27 AM2018-09-07T09:27:25+5:302018-09-07T09:31:30+5:30

७ सप्टेंबर १९८५ मध्ये पुण्यात राधिकाचा जन्म झाला. आज भारताची बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री अशी राधिकाची ओळख आहे.

radhika apte happy birthday unknown facts nude scene controversy | birthday special.... अन् राधिका आपटेचा तो ‘न्यूड सीन’ लीक झाला ...!!

birthday special.... अन् राधिका आपटेचा तो ‘न्यूड सीन’ लीक झाला ...!!

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेचा आज (७ सप्टेंबर)वाढदिवस. सध्या ‘नेटफ्लिक्स क्वीन’ म्हणून राधिकाला ट्रोल केले जातेय. याचे कारण म्हणजे, नेटफ्लिक्सच्या एकापाठोपाठ अशा वेबसीरिजमध्ये तिची लागलेली वर्णी. ७ सप्टेंबर १९८५ मध्ये पुण्यात राधिकाचा जन्म झाला. आज भारताची बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री अशी राधिकाची ओळख आहे. आपल्या दशकभरापेक्षा अधिक वर्षांच्या करिअरमध्ये न्यूड सीन कॉन्ट्रोव्हर्सीपासून ते डिजिटल इंटरटेनमेंट इंडस्ट्रीची स्टार इथपर्यंतचा तिचा प्रवास बऱ्याच चढउतारांनी भरलेला आहे.

राधिकाने गणित विषयात पदवी मिळवली़ पण तिचा रस सुरूवातीपासूनचं अभिनयात होता. खरे तर राधिका गेल्या दहा वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे. पण गेल्या चार-पाच वर्षांत ती एकदम प्रकाशझोतात आली.
२००५ मध्ये ‘वाह लाईफ हो तो ऐसी’ चित्रपटात राधिकाने एक लहानशी भूमिका केली होती. पण तिला फारसे कुणीच नोटीस केले नाही. २०११ मध्ये ‘शोर इन दि सिटी’ चित्रपटातून ती नावारुपाला आली. यादरम्यान तिचे नाव तुषार कपूरसोबतही जोडले गेले. पण पुढे त्यांचे ब्रेकअप झाले. 

२०१२ मध्ये राधिका गुपचूप लग्न करून मोकळी झाली. लंडनमधील म्युझिशियन बेनेडिक्ट टायलोसोबत तिने गुपचूप लग्नगाठ बांधली. २०११ मध्ये कंटेम्परेरी डान्स शिकायला राधिका लंडनमध्ये गेली होती. याच डान्स क्लासमध्ये बेनेडिक्टसोबत तिची ओळख झाली आणि दोघेही पे्रमात पडले. एक वर्षाच्या डेटींगनंतर तिने लग्न केले. पण लग्नाची गोष्ट तिने एक वर्ष दडवून ठेवली. आजही हे दोघे फार कमी एकत्र दिसतात.


नवाजुद्दीन सिद्दीकीसोबतच्या ‘मांझी’ या चित्रपटापासून राधिकाच्या अभिनयाची चर्चा व्हायला लागली. याचदरम्यानच्या काळात तिचा एक न्यूड सीन चर्चेत आला. २०१५ मध्ये अनुराग कश्यपने एक शॉर्ट फिल्म बनवली होती. ती केवळ इंटरनॅशनल मार्केटसाठी होती. यात एक न्यूड सीन होता. राधिकाला तो करण्यात काहीही हरकत नव्हती. खरे तर हा सीन लीक होऊ नये म्हणून आटोकाट प्रयत्न करण्यात आले होते. तरिही तो लीक झाला. यामुळे राधिकाला बरीच टीका सहन करावी लागली. अनुराग यामुळे कमालीचा संतापला होता.  राधिकाला यामुळे झालेल्या त्रासाबद्दलने त्याने स्वत:लाच जबाबदार ठरवले होते.



या कॉन्ट्रोव्हर्सीनंतर राधिका पुन्हा कधीच न्यूड सीनसाठी धजावणार नाही, असे मानले गेले. ती चांगलीच धाडसी निघाली. २०१६मध्ये राधिकाने ‘पार्च्ड’ चित्रपटात पुन्हा एकदा न्यूड सीन दिला.


हिंदीशिवाय बंगाली, मराठी, तेलगू आणि मल्याळम चित्रपटात तिने काम केले आहे. ‘दि वेटिंग रूम’, ‘रक्त चरित्र 1’, ‘रक्त चरित्र 2’, ‘आई एम’ यांसारख्या चित्रपटात मुख्य भूमिका केल्या होत्या. ६ वेगवेगळ्या भाषांमध्ये ३० पेक्षा अधिक चित्रपट केल्यानंतर २०१५ मध्ये ‘बदलापुर’ चिरपटातून तिला हिरोईन म्हणून ओळख मिळाली.

Web Title: radhika apte happy birthday unknown facts nude scene controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.