Priyanka Nick Wedding : परिणीती चोप्राने असे केले जीजू निकचे स्वागत!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2018 08:22 PM2018-12-02T20:22:45+5:302018-12-02T20:26:33+5:30

प्रियांकाची चुलत बहीण आणि निक जोनासची साळी परिणीती चोप्राने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

Priyanka Nick Wedding: Parineeti Chopra welcome nick jonas said jiju on social media | Priyanka Nick Wedding : परिणीती चोप्राने असे केले जीजू निकचे स्वागत!!

Priyanka Nick Wedding : परिणीती चोप्राने असे केले जीजू निकचे स्वागत!!

googlenewsNext
ठळक मुद्दे जोनास आणि चोप्रा कुटुंब एक झाले, याचा आनंद आहे, असे  परिणीतीने लिहिले आहे.

प्रियांका चोप्रा व निक जोनास यांनी काल १ डिसेंबरला सहजीवनाच्या आणाभाका घेतल्या. दोघांनीही जोधपूरच्या उमेद भवन येथे ख्रिश्चन पद्धतीने लग्नगाठ बांधली. आज प्रियांका व निक दोघेही हिंदू पद्धतीने विवाहबद्ध होत आहेत. याचदरम्यान प्रियांकाची चुलत बहीण आणि निक जोनासची साळी परिणीती चोप्राने एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे परिणीतीने जीजू निक जोनासचे चोप्रा कुटुंबात स्वागत केले आहे. कालच्या ख्रिश्चन पद्धतीने झालेल्या विवाहाची माहितीही परिणीतीने या पोस्टमध्ये दिली आहे. ‘नवरीला आनंदी आणि आरामदायी वाटावे, हे आम्हा ब्राईड्समेड्सचे काम होते. पण आम्ही निश्चिंत होतो. कारण हे काम अगदी आयुष्यभर करण्याचे वचन निकने दिले होते. कुटुंबात तुमचे स्वागत आहे, जीजू. जोनास आणि चोप्रा कुटुंब एक झाले, याचा आनंद आहे, असे  परिणीतीने लिहिले आहे.’

ताज्या माहितीनुसार, प्रियांका व निक बरदारी लॉनमध्ये हिंदू पद्धतीने विवाहबद्ध होणार आहेत. यासाठी ४० फूट उंच लग्नमंडप बनवण्यात आला आहे. या लग्नात गोवा बेस्ट मेन्यू असणार आहे. प्रियांका व निक दोघेही फुलांच्या चादरीवरून लग्नमंडपापर्यंत पोहोचणार आहेत. निक अगदी राजसी थाटात बग्घीवरून एन्ट्री घेणार आहे. 

अमेरिकन पॉप सिंगर निक जोनास व प्रियांका अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. याचवर्षी प्रियांकाच्या वाढदिवसाला निक भारतात आला होता आणि याचठिकाणी त्याने पीसीला लग्नासाठी प्रपोज केली. यानंतर भारतातचं प्रियांका व निकचा ‘रोका’ झाला होता.  लग्नानंतर प्रियांका-निक दोन रिसेप्शन देतील. यापैकी एक दिल्लीत होईल तर दुसरे मुंबईत.

Web Title: Priyanka Nick Wedding: Parineeti Chopra welcome nick jonas said jiju on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.