आतापर्यंत रिंग लपवणाऱ्या प्रियंकाने अशी खुलेआम दाखवली रिंग!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 12:31 PM2018-08-15T12:31:36+5:302018-08-15T12:33:00+5:30

आता प्रियंकाला तिचा साखरपुडा झाल्याची घोषणा करायची आहे असे वाटते आहे. कारण एक फोटो समोर आला असून त्यात प्रियंका रिंग दिसते आहे. 

Priyanka Chopra CONFIRMS engagement to Nick Jonas | आतापर्यंत रिंग लपवणाऱ्या प्रियंकाने अशी खुलेआम दाखवली रिंग!

आतापर्यंत रिंग लपवणाऱ्या प्रियंकाने अशी खुलेआम दाखवली रिंग!

googlenewsNext

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांच्या साखरपुड्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. पण प्रियंकाने ही बाब अनेकांपासून लपवली. मात्र आता प्रियंकाला तिचा साखरपुडा झाल्याची घोषणा करायची आहे असे वाटते आहे. कारण एक फोटो समोर आला असून त्यात प्रियंका रिंग दिसते आहे. 

मनीष मल्होत्राने नुकतीच एक पार्टी दिली होती. यात अनेक बॉलिवूड कलाकारांसोबतच प्रियंका चोप्राही आली होती. अभिनेत्री रविना टंडनही इथे आली होती आणि तिने पार्टीतील काही फोटो सोशल मीडियात शेअऱ केले आहेत. त्यात एका फोटोत प्रियंका आणि रविना आहेत. या फोटोत प्रियंका स्पष्टपणे आपली रिंग दाखवताना दिसते आहे. 

काही दिवसांपूर्वी प्रियंका तिची रिंग लपवताना दिसली होती. दिल्ली एअरपोर्टवर ती रिंग लवतानाचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. पण आता यात ती स्पष्ट दिसते आहे. म्हणजे तिचा साखरपुडा झालाय हे स्पष्ट झालंय. पण आता अधिकृतरित्या प्रियंका कधी तिच्या साखरपुड्याची घोषणा करणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. 

Web Title: Priyanka Chopra CONFIRMS engagement to Nick Jonas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.