आकाश- श्लोकाच्या प्री- एंगेजमेंट सेरेमनीत हातात हात घालून दिसले प्रियांका व निक!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 09:06 AM2018-06-29T09:06:17+5:302018-06-29T09:09:26+5:30

काल एंटिलियामध्ये रंगलेल्या पार्टीत बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी दिसले. प्रियांका चोप्रा तिचा कथित बॉयफ्रेन्ड निक जोनास याच्यासोबत दिसली. अगदी हातात हात घेऊन दोघांची एन्ट्री झाली.

priyanka chopra and nick jonas in akash ambani and shloka mehata engagement | आकाश- श्लोकाच्या प्री- एंगेजमेंट सेरेमनीत हातात हात घालून दिसले प्रियांका व निक!

आकाश- श्लोकाच्या प्री- एंगेजमेंट सेरेमनीत हातात हात घालून दिसले प्रियांका व निक!

googlenewsNext

मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी व श्लोका मेहता यांचा साखरपुडा उद्या ३० जूनला होत आहे. त्यापूर्वी काल अंबानींच्या एंटिलियामध्ये गॅ्रंड एंगेजमेंट पार्टी ठेवली गेली. काल एंटिलियामध्ये रंगलेल्या पार्टीत बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी दिसले. शाहरूख खान, गौरी खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट, करण जोहर, अयान मुखर्जी असे सगळे या पार्टीत हजर होते. प्रियांका चोप्रा तिचा कथित बॉयफ्रेन्ड निक जोनास याच्यासोबत दिसली. अगदी हातात हात घेऊन दोघांची एन्ट्री झाली. 

यावेळी प्रियांकाने चंदेरी काठांची लाल रंगाची साडी परिधान केली होती.

 तर निक नेव्ही ब्ल्यू रंगाच्या कोटमध्ये होता. या पार्टीत काही पारंपरिक विधीही केले गेले. यातील एका पारंपरिक विधीदरम्यान आकाशची बहीण ईशा आपला भाऊ आकाश आणि होणारी वहिनी श्लोका यांची आरती ओवाळताना दिसली. यानंतर श्लोकानेही आपल्या होणाऱ्या नणंदेला वाकून नमस्कार केला. मात्र श्लोका आपल्या पाया पडतेयं, हे पाहून ईशाने तिला लगेच मिठी मारली.


तुम्हाला माहित नसेल पण ईशा व श्लोका या दोघीही बालपणीच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. अनेकदा त्यांच्यातील बॉन्डिंग दिसली आहे़ आता हीच श्लोका ईशाची वहिणी होणार आहे. मार्चमध्येच आकाश व श्लोका यांनी आपले नाते जगजाहिर केले होते. गोव्यात या दोघांची प्री-एंगेजमेंट झाली होती. 

Web Title: priyanka chopra and nick jonas in akash ambani and shloka mehata engagement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.