'दिल्ली 6'मधील मसक्कली गाण्यातली कबूतरांचा दिवसाचा खर्च होता इतके हजार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2018 09:28 AM2018-01-13T09:28:18+5:302018-01-13T14:58:18+5:30

चित्रपटत 'दिल्ली6' हा 2009 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात अभिषेक बच्चन, सोनम कपूर, ऋषी कपूर, ओम पूरी, वहिदा ...

The pigeon's day spent in 'Delhi 6' with a musical song spent so many thousand | 'दिल्ली 6'मधील मसक्कली गाण्यातली कबूतरांचा दिवसाचा खर्च होता इतके हजार

'दिल्ली 6'मधील मसक्कली गाण्यातली कबूतरांचा दिवसाचा खर्च होता इतके हजार

googlenewsNext
त्रपटत 'दिल्ली6' हा 2009 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात अभिषेक बच्चन, सोनम कपूर, ऋषी कपूर, ओम पूरी, वहिदा रहमान, दिव्या दत्त, तन्वी आजमी अशी तगडी स्टारकास्ट होती.  या चित्रपटासाठी ए.आर. रहमानने दिलेल्या संगीत सगळ्यांच आवडले होते. या चित्रपटाती मसक्कली मसक्कली गाण्याला तरुणांची विशेष पसंती लागली होती. या गाण्यातील कबूतरांचा एक इटंरेस्टिंग किस्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 'दिल्ली6' मधील या गाण्यासाठी खास कबूतर आसम मधून मागवण्यात आले होते.  

त्याचे झाले असे की या चित्रपटातील बरीचशी शूटिंग जुन्या दिल्लीत झाली आहे. शूटिंगच्या ठिकाणी मोठ्या संख्येने कबूतर असायचे त्यामुळे शूटिंगमध्या व्यत्त्यय यायचा. त्यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी विचार आला की या कबूतरांना घेऊन आपण चित्रपटात एक गाणं शूट करावं. त्यासाठी त्यांनी प्रसून जोशी यांना त्या अनुषंगाने गाणं लिहायला सांगितले रहमानने त्याला संगीत दिले. 

ज्यावेळी हे गाणं शूट करण्याचा ठरले त्यादिवशी मात्र कबूतरांनी धोका दिला. जसे गाण्याचे शूटिंग करण्यासाठी कॅमेरा सेटवर गेले त्यावेळी सगळे कबूतर उडून गेले. या गोष्टीमुळे राकेश मेहरा हैराण झाले. त्यांनी आपला हा प्रॉब्लेम ए.आर. रहमानला सांगितला. रहमानने त्यांना आसामवरुन कबुतरा मागवण्याचा उपाय सुचवला. त्यानुसार राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी 12 कबुतर आसाम वरुन मागवले. कबुतर येईपर्यंत चित्रपटाची शूटिंग थांबवण्यात आली होती. आसाममधून आणालेल्या कबुतरांचा खर्च दिवसाला 13 हजार होता.  

या चित्रपटातील मसक्कली सध्या ती पॅडमॅनच्या प्रमोशन व्यस्त आहे.  मसक्कली म्हणजे आम्ही बोलतोय या चित्रपटातील अभिनेत्री सोनम कपूरबद्दल. पॅडमॅननंतर ती वीरे दी वेडींग या चित्रपटात दिसणार आहे. आदी हा चित्रपट मे महिन्यात रिलीज होणार होता. मात्र आता त्याची रिलीज डेट 1 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. यात सोनमसह करिना कपूर खान,  स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या मुख्य भूमिका आहेत

Web Title: The pigeon's day spent in 'Delhi 6' with a musical song spent so many thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.