इंग्रजी येत नाही म्हणून लोक मला हसायचे - कंगना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2016 02:11 PM2016-12-04T14:11:09+5:302016-12-04T14:42:06+5:30

कलाकारांच्या आयुष्यात स्ट्रगल हा असतोच. एखाद्या छोट्याशा गावातून किंवा शहरातून आलेला कलाकार पुढे त्याच्या कष्ट, प्रयत्न, समर्पणाने ‘बी टॉऊन ...

People laughed at me as English does not come - Kangana | इंग्रजी येत नाही म्हणून लोक मला हसायचे - कंगना

इंग्रजी येत नाही म्हणून लोक मला हसायचे - कंगना

googlenewsNext
ाकारांच्या आयुष्यात स्ट्रगल हा असतोच. एखाद्या छोट्याशा गावातून किंवा शहरातून आलेला कलाकार पुढे त्याच्या कष्ट, प्रयत्न, समर्पणाने ‘बी टॉऊन ’चा स्टार आर्टिस्ट होतो. असे अनेक कलाकार बॉलिवूडमध्ये आहेत. कंगना राणौत ही अभिनेत्री देखील हिमाचल प्रदेशमधील छोट्या खेडेगावातून ‘बी टाऊन’ मध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी आली होती आणि आज मात्र तिला राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. आज जरी ती एक अष्टपैलू कलाकार झाली असली तरीही ती सांगते की,‘ स्ट्रगलिंग काळात मला माझ्या इंग्रजीवरून लोक खुप हसायचे.’ 



‘मी जरी एका छोट्याशा खेड्यातून आले असले तरीही मला त्या भागाचा अभिमान आहे. आज मी जे काही आहे ते केवळ तेथील लोकांमुळे, माझ्या घरच्या सदस्यांमुळे. सुरूवातीच्या काळात सर्वजण मला माझ्या ड्रेसिंग स्टाईल, बोलणं, इंग्रजी यावरून खुप हसायचे, बोलायचे. पण, हसणारे हसतात म्हणून मी काही गोष्टी सोडून द्यायचे. पण आता मी जेव्हा स्वत:ला प्रेक्षकांसमोर प्रेझेंट करते तेव्हा सर्वांची प्रतिक्रिया हीच असते की, ‘किती सुंदर अभिनेत्री आहे ही.’ खरंतर महिलांना नेहमीच अशी वागणूक मिळत राहणार. पण त्यांनी अगोदर स्वत:वर विश्वास ठेवायला हवा. त्यांच्या मार्गात कितीही अडचणी आल्या तरीही त्यांनी न डगमगता आपले ध्येय साध्य करावयाचे असते. आता मी ५ दिवस चित्रपटाची शूटिंग केली तेव्हा मला सर्वांप्रमाणेच समान वागणूक मिळाली.’
 
कंगणा राणौत सध्या ‘रंगून’ आणि ‘सिम्रन ’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘रंगून’चे पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू असून सिम्रनचे शूटिंग कंगना करते आहे. रंगून साठी तिने विशेष ट्रेनिंग घेतली असून सिम्रनमधील तिच्या भूमिकेविषयी बरंच कौतुक करण्यात येत आहे. मध्यंतरी थंडावलेला हृतिकसोबतचा तिचा वाद पुन्हा चर्चेत आला आहे. 

Web Title: People laughed at me as English does not come - Kangana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.