​काळवीट शिकारप्रकरण : सलमान पुन्हा अडचणीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2016 04:54 PM2016-11-11T16:54:13+5:302016-11-11T16:54:13+5:30

अभिनेता सलमान खानला काळवीट शिकारप्रकरणी पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. काळवीट शिकारप्रकरणी सलमानच्या सुटकेला आव्हान देणारी राजस्थान सरकारची याचिका सर्वोच्च ...

Peacock Preaching: Salman again! | ​काळवीट शिकारप्रकरण : सलमान पुन्हा अडचणीत!

​काळवीट शिकारप्रकरण : सलमान पुन्हा अडचणीत!

googlenewsNext
िनेता सलमान खानला काळवीट शिकारप्रकरणी पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. काळवीट शिकारप्रकरणी सलमानच्या सुटकेला आव्हान देणारी राजस्थान सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. या याचिकेवर आता सुनावणी होणार असून न्यायालयाने याप्रकरणात सलमानलाही नोटीस बजावली आहे.
 राजस्थान उच्च न्यायालयाने याचवर्षी २५ जुलै रोजी सलमानची काळवीट शिकार प्रकरणातून निर्दोष सुटका केली होती. सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने हा निर्णय दिला होता. मात्र या निर्णयाला  राजस्थान सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सलमानविरोधातील याचिकेची तातडीने सुनावणी घ्यावी अशी विनंती शुक्रवारी राजस्थान सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयास करण्यात आली. यानंतर  राजस्थान सरकारची ही मागणी मान्य करत सर्वोच्च न्यायालयासलमान खानला नोटीस बजावली आहे.
 
काय आहे प्रकरण...
-सन १९९८ मध्ये ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान कंकणीजवळ सलमान व त्याच्या सहकाºयांनी चिंकारा काळविटाची शिकार केल्याचा आरोप आहे. 
-बिष्णोई समाजाच्या तक्रारीनंतर २ आॅक्टोबर १९९८ रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
- त्यानंतर १२ आॅक्टोबरला सलमानला अटकही करण्यात आली होती. मात्र, पाच दिवसांनी त्याची जामीनावर सुटका झाली होती. 
-२००६ मध्ये वन्य प्राणी कायद्यानुसार जोधपूर येथील भवद जवळ चिंकाराची शिकार केल्या प्रकरणी सलमानला एक वर्ष कारावास आणि ५००० रुपए दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. 
-सलमान व्यतिरिक्त अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्यावर देखील दोन काळविटाची शिकार केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर २००७ मध्ये राजस्थान उच्च न्यायालयाने काळवीट शिकारप्रकरणी सलमानला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती.

Web Title: Peacock Preaching: Salman again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.