रियल लाइफमधील ही जोडी झळकणार रुपेरी पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 11:07 AM2018-07-23T11:07:46+5:302018-07-23T11:15:09+5:30

तब्बल 8 वर्षानंतर 'गुलाबजाम' चित्रपटात अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय रोमांस करताना दिसणार आहेत.

This pair of Real Life will be seen on the silver screen | रियल लाइफमधील ही जोडी झळकणार रुपेरी पडद्यावर

रियल लाइफमधील ही जोडी झळकणार रुपेरी पडद्यावर

googlenewsNext
ठळक मुद्देऐश्वर्या आणि अभिषेक तब्बल ८ वर्षांनी झळकणार रुपेरी पडद्यावरअभिषेक व ऐश्वर्याने लग्नाआधी केले होते 'गुरू' चित्रपटात काम

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडींच्या यादीतील एक जोडी म्हणजे अभिनेता अभिषेक बच्चन व अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन. अभिषेक व ऐश्वर्याने 'कुछ ना कहो', 'गुरू', 'उमराव जान', 'ढाई अक्षर प्रेम के', 'रावण' व 'सरकार राज' यांसारख्या चित्रपटात एकत्र काम करून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले. आता ही जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 'गुलाब जामून' असे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव असून या निमित्ताने ऐश्वर्या आणि अभिषेक तब्बल ८ वर्षांनी एकत्र काम करणार आहेत.


 लग्नाआधी या दोघांनी 'गुरु' सिनेमात एकत्र काम केले होते. मध्यंतरीच्या काळात ऐश्वर्या आणि अभिषेकने एकमेकांसोबत काम करण्यासाठी नकार दिल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता हे दोघे एका सिनेमात काम करणार असल्याचे नक्की झाले आहे. या बातमीमुळे त्या दोघांचे चाहते खुश झाले आहेत. 
अनुराग कश्यपची निर्मिती असलेल्या 'गुलाब जामून' सिनेमात अभिषेक आणि ऐश्वर्याची लव्हस्टोरी पाहायला मिळणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. सर्वेश मेवाडा हे या सिनेमाचे दिग्दर्शन करणार असून दोन वर्षांपूर्वीच चित्रपटाच्या कामाला सुरुवात झाली होती. मात्र, दोन वर्षांपूर्वी काही कारणांमुळे ऐश्वर्या आणि अभिषेकने एकमेकांसोबत काम करायला नकार दिल्याची माहिती समोर आली होती. मात्र लवकरच हे दोघे चित्रपटाच्या  शूटिंगला सुरुवात करतील असे समजते आहे. गुलाब जामून चित्रपटाच्या निमित्ताने या 'रिअल लाईफ' कपलला 'रिल लाईफ'मध्ये पुन्हा एकदा रोमान्स करताना पाहायची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. सध्या अभिषेक बच्चन 'मनमर्जिया' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे तर ऐश्वर्या राय 'फन्ने खान' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या दोघांना इतक्या वर्षानंतर रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत. 

Web Title: This pair of Real Life will be seen on the silver screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.