अपघातातून थोडक्यात बचावले ‘हे’ बॉलिवूड स्टार्स !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 04:33 AM2017-11-28T04:33:43+5:302017-11-28T10:03:43+5:30

-रवींद्र मोरे  बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन एका रोड अपघातातून थोडक्यात बचावण्याची घटना नुकतीच घडली. बिग बी अलिकडे ...

'O' Bollywood Stars! | अपघातातून थोडक्यात बचावले ‘हे’ बॉलिवूड स्टार्स !

अपघातातून थोडक्यात बचावले ‘हे’ बॉलिवूड स्टार्स !

googlenewsNext
ong>-रवींद्र मोरे 
बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन एका रोड अपघातातून थोडक्यात बचावण्याची घटना नुकतीच घडली. बिग बी अलिकडे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोलकाता गेले होते. त्याठिकाणी त्यांच्या चारचाकी वाहनाचे चाक निघून अपघात झाला मात्र अमिताभ बच्चन थोडक्यात बचावले. बॉलिवूडचे असेच काही स्टार्स आहेत ज्यांचाही अपघात झाला मात्र सुदैवाने त्यांना काहीही इजा झाली नाही. जाणून घेऊया त्यांच्याबाबत... 

Image result for amitabh car accident

* अमिताभ बच्चन
मेगास्टार अमिताभ बच्चन आणि अपघात जणू समिकरणच आहे. एवढ्या लांब चित्रपट करिअरच्या प्रवासात त्यांच्यासोबत कित्येक अपघात झाले आहेत. कुली या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ते गंभीर जखमी झाले होते. याशिवाय ‘अलादीन’ या चित्रपटाच्या सेट वरदेखील अमिताभ बच्चन सोबत दोनदा अपघात झाला होता. आता नुकताच त्यांच्या चारचाकी वाहनाचा अपघात झाला आणि त्यात ते थोडक्यात बचावले. या प्रकरणी मात्र शासनाने ट्रॅव्हल एजन्सीला कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे.   

Related image

* शाहरुख खान
शाहरुख खान आणि काजोल स्टारर चित्रपट ‘दिलवाले’च्या शूटिंगदरम्यान किंग खान पाण्यात बुडताना थोडक्यात बचावला होता. या चित्रपटातील गेरूआ या गाण्याची शूटिंग सुरु होती. हे गाणे खूपच सुंदर लोकेशनवर शूट झाले आहे. या गाण्याचा एक सीन एका झऱ्याच्या किनाऱ्यावर शूट होत होता. तेव्हा अचानक शाहरुखचा पाय घसरतो. अशातच काजोलने तात्काळ शाहरुखचा हात पकडून त्याला खाली पडण्यापासून वाचविते.   

Image result for aditi rao accident

* अदिति राव हैदरी
याच वर्षी प्रदर्शित झालेला संजय दत्तचा चित्रपट ‘भूमि’ च्या सेटवर भयानक आग लागली होती. या दरम्यान खूपच धावपळ झाली होती. ही आग शॉटॅ सर्किटच्या कारणाने लागली होती. मात्र या आगीतून अभिनेत्री अदिती राव हैदरी थोडक्यात बचावली होती.  

Related image

* जेनेलिया डिसूजा
२०११ मध्ये ‘फोर्स’ या चित्रपटाची शूटिंगदरम्यान एक अपघात झाला होता. त्यावेळी जॉनने आपली को-अ‍ॅक्ट्रेस जेनेलियाला वाचविले होते. चित्रपटाची शूटिंग सुरु होती, त्यात जॉन आणि जेनेलिया एका चारचाकी वाहनात होते, आणि त्याचवेळी अपघात झाला. या अपघाताने जेनेलिया खूपच घाबरली होती. तेव्हा जॉनने जेनेलिया आणि स्वत:ला जीपमधून सुरक्षित बाहेर काढले होते.  

Related image

* लारा दत्ता
बॉलिवूडमध्ये अक्षय कुमारची ओळख तशी खिलाडीम्हणूनच आहे. फक्त चित्रपटातच नव्हे तर रियल लाइफमध्येही तो डॅशिंग आहे. आपल्या टीम मेंबर्सना मदत करण्यात अक्षय सदैव तत्पर असतो. ‘अंदाज’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेट वर जेव्हा लारा दत्ता घसरुन समुद्रात पडली होती, तेव्हा अक्षयने तिला वाचविले होते.  

 

  

Web Title: 'O' Bollywood Stars!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.