सिद्धार्थ मल्होत्रा दिसणार नीरज पांडेच्या 'अय्यारी'मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2017 10:30 AM2017-06-05T10:30:09+5:302017-06-05T16:02:06+5:30

सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच त्याचा आगामी चित्रपट अय्यारीच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. याचित्रपटाची कथा नीरज पांडेची आहे आणि तोच या ...

Neeraj Pandey's 'Ayyar' appears in Siddharth Malhotra | सिद्धार्थ मल्होत्रा दिसणार नीरज पांडेच्या 'अय्यारी'मध्ये

सिद्धार्थ मल्होत्रा दिसणार नीरज पांडेच्या 'अय्यारी'मध्ये

googlenewsNext
द्धार्थ मल्होत्रा लवकरच त्याचा आगामी चित्रपट अय्यारीच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. याचित्रपटाची कथा नीरज पांडेची आहे आणि तोच या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.  सिद्धार्थने नुकतेच इत्तेफाक चित्रपटाची शूटिंग पूर्ण केले आहे. त्यामुळे तो आता आगामी चित्रपट अय्यारीच्या शूटिंगला लागणार आहे. याचित्रपटाची शूटिंग कश्मीर आणि दुसऱ्या काही भागांमध्ये होणार आहे. सध्या सिद्धार्थ या चित्रपटातील भूमिकेची तयारी करतोय तसेच तो शूटिंगला घेऊन खूपच उत्साहित असल्याचे कळतेय. अय्यारीमध्ये सिद्धार्थ सक्सेना नावाच्या गुप्तहेराची भूमिका साकारतोय. अय्यारी हा एक क्राइम-ड्रामा चित्रपट आहे. याचित्रपटात आपल्याला लंडन, काश्मीर आणि दिल्ली दिसणार आहे. खऱ्या लोकेशन्सवर जाऊन शूट करण्यासाठी दिग्दर्शक नीरज पांडे ओळखला जातो. याचित्रपटाचे मुख्य चित्रीकरण काश्मीरमध्ये होणार आहे. अय्यारीमध्ये सिद्धार्थ मल्होत्राशिवाय मनोज वाजपेयीची ही महत्त्वाची भूमिका आहे. 

सिद्धार्थ जवळ सध्या याशिवाय रिलोडेड आणि आशिकी-3 हे दोन चित्रपट वेटिंगमध्ये आहेत. इत्तेफाक चा रिमेकला अभय चोप्रा दिग्दर्शन करतोय तर धर्मा आणि रेड चिलीज या चित्रपटाचे निर्माते आहेत. इत्तेफाकमध्ये सिद्धार्थ आणि सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत दिसतील. हा चित्रपट 26 जानेवारी 2018 ला प्रदर्शित होणार आहे.  त्यामुळे त्याचे चाहत्ये नक्कीच खूश असतील. 

रिलोडेडमध्ये सिद्धार्थसोबत जॅकलिन फर्नांडिस दिसणार आहे. या चित्रपटाच्या सेटवर सिद्धार्थ आणि जॅकलिन अतिच फ्रेन्डली झाल्यामुळे आलिया आणि सिद्धार्थमध्ये भांडण झाले होते. सिद्धार्थ आणि जॅकलिन कॉफी आणि आऊटिंग सगळे एकत्र करतात. ही गोष्ट आलियाच्या कानावर जाताच सिद्धार्थ आणि तिच्यात जोरदार भांडण झाले.     

Web Title: Neeraj Pandey's 'Ayyar' appears in Siddharth Malhotra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.