नवाजुद्दीन सिद्दीकी व अथिया शेट्टी दिसणार ह्या सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 06:36 PM2018-10-27T18:36:02+5:302018-10-27T18:37:37+5:30

नवाजुद्दीन सिद्दीकी व अथिया शेट्टी आगामी चित्रपट 'मोतीचूर चकनाचूर' या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे.

Nawazuddin Siddiqui and Athiya Shetty will appear in this film | नवाजुद्दीन सिद्दीकी व अथिया शेट्टी दिसणार ह्या सिनेमात

नवाजुद्दीन सिद्दीकी व अथिया शेट्टी दिसणार ह्या सिनेमात

googlenewsNext
ठळक मुद्देनवाजुद्दीन सिद्दीकी व अथिया शेट्टी पहिल्यांदाच करणार एकत्र कामनवाजुद्दीन सिद्दीकी व अथिया शेट्टीच्या आगामी सिनेमाचे नाव 'मोतीचूर चकनाचूर'


'मंटो' चित्रपटानंतर अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आता वराच्या अंदाजात दिसतो आहे. सध्या तो या वराच्या लूकमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. नवाजुद्दीन आगामी चित्रपट 'मोतीचूर चकनाचूर' या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटातील एक फोटो व्हायरल झाला आहे ज्यात नवाज वराच्या गेटअपमध्ये असून त्याच्यासोबत एक मुलगा देखील आहे. हा चित्रपट रोमँटिक कॉमेडी असणार आहे.

'हिरो' चित्रपटातून बॉलिवू़डमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अथिया शेट्टी या चित्रपटात नवाजुद्दीन सोबत दिसणार आहे. 'मोतीचूर चकनाचूर' असे काहीसे वेगळे शीर्षक असलेल्या या चित्रपटाच्या शूटिंगला या दोघांनीही सुरूवात केलेली आहे. अथिया या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच नवाजसोबत काम करणार आहे. कारकीर्दीच्या सुरूवातीला नवाजुद्दीन सारख्या अष्टपैलू अभिनेत्यांसोबत काम करायला मिळणे ही अथियासाठी खूप मोठी बाब आहे. हे दोघे एका चित्रपटात असले तरी ते एकमेकांसोबत दिसणार का, हे अद्याप समजू शकलेले नाही. या सिनेमाचे दिग्दर्शन देबामित्रा हसन करत असून निर्मिती राजेश व किरण भाटीया करत आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'मोतीचूर चकनाचूर' हा चित्रपट वेडिंगवर आधारीत असून विनोदाची पूरेपूर मेजवाणी यात मिळणार आहे. या चित्रपटात अथिया उत्तर भारतातील छोट्याशा शहरातील मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. नवाजुद्दीन यात मुख्य भूमिकेत दिसणार असून सिच्युएशनल कॉमेडीवर भर देण्यात आला आहे. भोपाळमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू असून तिथेच चित्रपटातील महत्त्वाचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. अद्याप या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समजू शकलेली नाही. नवाजुद्दीन सिद्दीकी व अथिया शेट्टी या दोघांना एकत्र रुपेरी पडद्यावर पाहणे कमालीचे ठरणार आहे. 
 

Web Title: Nawazuddin Siddiqui and Athiya Shetty will appear in this film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.