​मुकेश अंबानींच्या पार्टीत पोहोचले बॉलिवूड! पाहा, काही खास फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 05:38 AM2017-12-04T05:38:43+5:302017-12-04T11:08:43+5:30

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरची कुठलीही पार्टी असो, बॉलिवूड सेलिब्रिटी या पार्टीची शान वाढवताना दिसतात. केवळ बॉलिवूड सेलिब्रिटीचं नाही ...

Mukesh Ambani's party reached Bollywood Look, some special photos !! | ​मुकेश अंबानींच्या पार्टीत पोहोचले बॉलिवूड! पाहा, काही खास फोटो!!

​मुकेश अंबानींच्या पार्टीत पोहोचले बॉलिवूड! पाहा, काही खास फोटो!!

googlenewsNext
्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरची कुठलीही पार्टी असो, बॉलिवूड सेलिब्रिटी या पार्टीची शान वाढवताना दिसतात. केवळ बॉलिवूड सेलिब्रिटीचं नाही तर क्रिकेट खेळाडूंपासून अनेक राजकीय नेत्यांपर्यंत सगळेच अंबानींच्या पार्टीला हजर असतात. रविवारी रात्री अंबानींच्या घरी अशीच ग्रॅण्ड पार्टी रंगली. लंडनचे मेयर सादिक खान यांच्यासाठी ही पार्टी आयोजित केली गेली होती.यावेळी अनेक बॉलिवूड स्टार्सनी या पार्टीला हजेरी लावली. या पार्टीचे काही इनसाईड फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.



अमिताभ बच्चन, शाहरूख खान, आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, कॅटरिना कैफ असे सगळे स्टार्स यावेळी दिसले.



बिग बी अमिताभ बच्चन यांनी या पार्टीत मुलगी श्वेता नंदा हिच्यासोबत हजेरी लावली. मुकेश अंबानींच्या पत्नी नीता अंबानी सगळ्यांचे स्वागत करताना दिसल्या.
अभिनेत्री जुही चावला पती जय मेहता यांच्यासोबत पार्टीला पोहोचली.



कॅटरिना कैफ आणि आलिया भट्ट या दोघीही पार्टीला पोहोचल्या. विशेष म्हणजे, दोघींनीही कॅमे-याला एकत्र पोज दिली. यावेळी आलिया ब्लॅक अ‍ॅण्ड यॅलो स्कर्टमध्ये तर कॅटरिना पांढºया साडीत दिसली. दोघीही किती सुंदर दिसत होत्या, हे तुम्हाला कळेलच.



आलियाचा कथित बॉयफ्रेन्ड यावेळी आलियासोबत नाही तर नेहा धूपियासोबत दिसला. नेहासोबत तो कॅमेºयांना सामोरा गेला.



क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर पत्नी अंजलीसोबत या पार्टीला हजर होता.



अभिनेत्री श्रीदेवी ही नेहमी अंबानींच्या पार्टीला हजर असते. कालच्या पार्टीतही श्रीदेवी दिसली. डेनिम स्कर्टमध्ये आलेल्या श्रीदेवीने पार्टीला ‘चार चाँद’ लावलेत.



किंगखान शाहरूख खान यानेही पार्टीला हजेरी लावली. यावेळी तो मुकेश अंबांनींसोबत दिसला.

ALSO READ : अंबानींच्या ‘गणेश पार्टी’त असा होता बॉलिवूड सेलिब्रिटींचा थाट! दीपिका-रणवीरची ‘कपल एन्ट्री’!!



या फोटोत शाहरूख मुकेश अंबानींचा मुलगा अनंत याच्यासोबत दिसतो आहे.

Web Title: Mukesh Ambani's party reached Bollywood Look, some special photos !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.