Molestation Case : प्रिती झिंटा व नेस वाडिया मानणार का मुंबई उच्च न्यायालयाचा सल्ला?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 07:03 PM2018-10-02T19:03:10+5:302018-10-02T19:04:47+5:30

अभिनेत्री प्रिती झिंटा आणि उद्योजक नेस वाडिया यांच्यातील चार वर्षे कायदेशीर प्रकरण अजूनही मिटलेले नाही. चार वर्षांपूर्वी प्रितीने नेस वाडियावर विनयभंगाचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. 

Molestation Case: preity zinta 2014 molestation case bombay hc says finish off | Molestation Case : प्रिती झिंटा व नेस वाडिया मानणार का मुंबई उच्च न्यायालयाचा सल्ला?

Molestation Case : प्रिती झिंटा व नेस वाडिया मानणार का मुंबई उच्च न्यायालयाचा सल्ला?

googlenewsNext

अभिनेत्री प्रिती झिंटा आणि उद्योजक नेस वाडिया यांच्यातील चार वर्षे कायदेशीर प्रकरण अजूनही मिटलेले नाही. चार वर्षांपूर्वी प्रितीने नेस वाडियावर विनयभंगाचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. मुंबई उच्चन्यायालयात सुरु असलेल्या या प्रकरणाला आता एक वेगळी कलाटणी मिळाली आहे. हे प्रकरण समोपचाराने मिटवावे, असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने प्रिती व नेस यांना दिला आहे.
नेस वाडिया माफी मागण्यास तयार असेल तर आम्ही ही केस मागे घेऊ, असे प्रिती झिंटाच्याा वकीलांनी न्यायालयात स्पष्ट केले आहे. मात्र नेस वाडियाच्या वकीलांनी यास नकार दिला. आम्ही माफी मागणार नाही. प्रिती केवळ मीडियाचे लक्ष स्वत:कडे वेधू इच्छिते, असा आरोपही नेस वाडियाच्या वकीलांनी केले.
दोन्ही पक्षाच्या या युक्तिवादानंतर हे प्रकरण समोपचाराने मिटू शकतं, त्यादृष्टीने प्रयत्न करा, असा सल्ला मुंबई उच्चन्यायालयाने दोन्ही पक्षांना दिला. शिवाय ९ आॅक्टोबरला होणा-या पुढील सुनावणीत प्रिती आणि नेस दोघांनाही जातीने हजर होण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या या सल्ल्याचा प्रिती व नेस यांच्यावर किती परिणाम होतो, हे बघूच.

काय आहे प्रकरण!

३० मे २०१४ रोजी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपरकिंग्ज या दोन संघांदरम्यान आयपीएलचा सामना सुरु होता. त्यावेळी वानखेडे मैदानाच्या  पॅव्हेलियनमध्ये बसलेलं पाहून नेस वाडियाने आपल्याला तिकीट वाटपावरून आपल्या टीमच्या कर्मचाऱ्यांच्या देखत शिवीगाळ केली. त्यानंतर मी जागा बदलली. मात्र  नेसने  पुन्हा आपल्याला शिवीगाळ करत असभ्य वर्तन केले आणि हात जोरात खेचला, असा प्रिती झिंटाचा आरोप आहे. मात्र हे सगळे आरोप नेस वाडियाने फेटाळून लावले आहेत.

Web Title: Molestation Case: preity zinta 2014 molestation case bombay hc says finish off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.