आयपीएल 2018 च्या लीलावात या स्टार किड्सवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2018 05:36 AM2018-01-29T05:36:33+5:302018-01-29T11:11:42+5:30

नुकतीच आयपीएल सीझन 11 च्या खेळाडूंची लीलाव प्रक्रिया पार पडली. यावेळी नीता अंबानी , प्रीती झिंटा जुही चावला असे ...

The look of the stars in the IPL in 2018 | आयपीएल 2018 च्या लीलावात या स्टार किड्सवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा

आयपीएल 2018 च्या लीलावात या स्टार किड्सवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा

googlenewsNext
कतीच आयपीएल सीझन 11 च्या खेळाडूंची लीलाव प्रक्रिया पार पडली. यावेळी नीता अंबानी , प्रीती झिंटा जुही चावला असे अनेक सेलिब्रेटी यावेळी हजर होते. मात्र सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या त्या एका स्टार किड्स जान्हवी मेहतावर. आयपीएल 2018 च्या लीलावा दरम्यान जान्हवी टेबलवर सगळ्यात जास्त अॅक्शन मध्ये दिसली. कोलकत्ता नाईट राईट्सच्या मॅनेजमेंट टीमची एक महत्त्वाची सदस्य म्हणून जान्हवी हजर होती. जान्हवी अभिनेत्री जुही चावला आणि जय मेहता यांची मोठी कन्या आहे. आयपीएलच्या लीलावात सहभागी होणारी जान्हवी सगळ्यात लहान वयाची मेंबर आहे. जान्हवीने पहिल्यांदाच आयपीएलच्या लीलावात सहभाग घेतला होता. यावेळी ती अत्यंत सिंपल लूकमध्ये दिसली. जान्हवी नेहमीच लाईमलाईटपासून दूर राहते. जान्हवीचा जन्म 21 फेब्रुवारी 2001मध्ये झाला आहे. धीरुभाई अंबानी स्कूलमधून तिने शिक्षण पूर्ण केले आहे. शाळेत तिने नेहमीच टॉप केले आहे.  सध्या ती लंडनच्या चार्टर हाउस बोर्डिंग स्कूलमध्ये शिकत आहे. जान्हवी दीपिका पादुकोण आणि वरुण धवनची फॅन आहे. मात्र आपल्या आईप्रमाणे जान्हवीला अभिनयात करिअर करायचे नाही आहे. तिला लेखिका बनायचे आहे. 

काही दिवसांपूर्वी जुहीने सांगितले होते की, माझी मुलं शिक्षण घेत आहेत. मोठी मुलगी अभ्यासात हुशार आहे. मला असे वाटते की, ती लेखिका बनणार. शाळेत ती नेहमीच टॉप राहिली आहे. तिला इतिहास या विषयात विशेष रूची आहे. ती चित्रपटांमध्ये काम करणार काय? असा जर कोणाला प्रश्न पडत असेल तर मला असे वाटते की, बॉलिवूडमध्ये सुरुवातीच्या तुलनेत बराच बदल झाला आहे. अशातही ती जर अभिनय क्षेत्रात करिअर करू इच्छित असेल तर मला सर्वाधिक आनंद होईल. मात्र अशात मी तिला एक सल्ला देऊ इच्छिणार. होय, तिने वायफळ गोेष्टी, गॉसिप आणि पार्ट्यांपासून दूर राहत आपल्या कामावर फोकस करावा, अशी माझी इच्छा असेल.  


 

Web Title: The look of the stars in the IPL in 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.