#LokmatWomenSummit2018 : #MeToo ही अख्ख्या समाजाची समस्या- दिव्या सेठ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 12:25 PM2018-10-26T12:25:34+5:302018-10-26T12:28:09+5:30

#MeToo ते #WeToo ‘ती’ची बोलण्याची ताकद, या संकल्पनेवर आधारित असलेल्या ‘लोकमत वुमेन समिट2018’च्या सातव्या पर्वात बोलताना अभिनेत्री दिव्या सेठ हिने ‘मीटू’ मोहिमेवर परखड भाष्य केले.

  #LokmatWomenSummit: #MeToo is the problem of the whole community - Divya Seth | #LokmatWomenSummit2018 : #MeToo ही अख्ख्या समाजाची समस्या- दिव्या सेठ

#LokmatWomenSummit2018 : #MeToo ही अख्ख्या समाजाची समस्या- दिव्या सेठ

महिलाशक्तीच्या आविष्काराची ओळख बनलेल्या ‘लोकमत वुमेन समिट2018’च्या सातव्या पर्वाला आज शुक्रवारी पुण्यात सुरूवात झाली.  #MeToo ते #WeToo ‘ती’ची बोलण्याची ताकद, या संकल्पनेवर आधारित असलेल्या आजच्या सातव्या पर्वात बोलताना अभिनेत्री दिव्या सेठ हिने ‘मीटू’ मोहिमेवर परखड भाष्य केले. महिलांनी स्वत:विरूद्धच्या अन्यायाविरोधात बोलणे गरजेचे आहे. इतक्या वर्षांपासून होत असलेल्या अत्याचाराविरोधात आवाज उठवला पाहिजे, असे त्या म्हणाल्या. स्वत:वरच्या अत्याचाराविरोधात बोलणाऱ्या मुलीला, महिलेला दोष देणे, ती इतक्या वर्षे शांत का बसली? असले प्रश्न विचारून ही समस्या सुटणारी नाही. कामाच्या ठिकाणी महिलांचे शोषण ही आपल्या समाजाची समस्या आहे. ही समस्या संपवायची तर सगळ्यांनी एकत्र यायला हवे़, असे दिव्या सेठ म्हणाल्या. ‘लोकमत वुमेन समिट2018’च्या व्यासपीठावर मीटू मोहिमेला पाठींबा दिला जात आहे, या विषयावर बोलण्याची संधी दिली जात आहे, हे महत्त्वाची गोष्ट आहे. यासाठी मी लोकमतचे आभार मानते, अभिनंदन करते, असेही त्या म्हणाल्या.

Web Title:   #LokmatWomenSummit: #MeToo is the problem of the whole community - Divya Seth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.