काय निवडणुकीमुळे लांबली ‘आर. के. नगर’ची रिलीज डेट? 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 10:40 AM2019-04-10T10:40:44+5:302019-04-10T10:41:23+5:30

केवळ राजकीय चित्रपटच नाही तर वेंकट प्रभु प्रॉडक्शनचा ‘आर. के. नगर’ हा आगामी तामिळ चित्रपटही असाच वादात सापडला आहे.

Lok Sabha polls postpone RK Nagar release. Producer Venkat Prabhu asks support for film | काय निवडणुकीमुळे लांबली ‘आर. के. नगर’ची रिलीज डेट? 

काय निवडणुकीमुळे लांबली ‘आर. के. नगर’ची रिलीज डेट? 

googlenewsNext
ठळक मुद्देचित्रपटाचे निर्माते वेंकट प्रभु यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून चाहत्यांची मदत मागितली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बायोपिक ‘पीएम नरेंद्र मोदी’ कायम वादात आहे. निवडणुकीपूर्वी हा चित्रपट रिलीज व्हावा, यासाठी जोरकस प्रयत्न होत आहेत. पण निवडणुकीपूर्वी हा चित्रपट रिलीज झाल्यास ते आचारसंहितेचे उल्लंघन ठरेल आणि यामुळे मतदार प्रभावित होतील, असा दावा करत काही राजकीय पक्षांनी या चित्रपटाला विरोध चालवला आहे. त्यामुळे दोनवेळा या चित्रपटाची रिलीज डेट लांबणीवर पडली आहे. पण केवळ राजकीय चित्रपटच नाही तर वेंकट प्रभु प्रॉडक्शनचा ‘आर. के. नगर’ हा आगामी तामिळ चित्रपटही असाच वादात सापडला आहे.




‘आर. के. नगर’ या चित्रपटाची रिलीज डेट आत्तापर्यंत अनेकदा लांबणीवर पडली आहे. दीर्घकाळानंतर एप्रिल महिन्यात हा चित्रपट रिलीज होणार, असे मानले गेले होते. पण आता या चित्रपटासाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. याचमुळे आता या चित्रपटाच्या निर्मात्यांनी लोकांचा पाठींबा मागितला आहे.
चित्रपटाचे निर्माते वेंकट प्रभु यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून चाहत्यांची मदत मागितली आहे. ‘आर. के. नगर’ हा राजकीय चित्रपट नाही. हा एक मनोरंजक चित्रपट आहे. प्रत्येकजण हा चित्रपट पाहू शकतात, असा दावा त्यांनी केला आहे. दिग्दर्शक सर्वन राजन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. वैभव, संपथ, सना अल्ताफ आणि इनिगो प्रभाकरण यात लीड रोलमध्ये आहेत. अर्थात चित्रपट लांबणीवर का पडला, याचे खरे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. काहींच्या मते, हा चित्रपट एक पॉलिटिकल कॉमेडी आहे.
काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. पण  आताश: रिलीज डेट  लांबणीवर पडत राहिल्याच चित्रपटाची कमाई प्रभावित होण्याचा धोका निर्मात्यांना जाणवू लागला आहे.

Web Title: Lok Sabha polls postpone RK Nagar release. Producer Venkat Prabhu asks support for film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.