#Kekechallengeने झपाटले! निया शर्मा, करिश्मा शर्मापाठोपाठ अदा शर्माच्या हॉट ‘अदां’नी लावली आग!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 09:14 PM2018-07-29T21:14:14+5:302018-07-29T21:15:04+5:30

सध्या नेटिजन्सला  #Kekechallenge नावाच्या चॅलेंजने झपाटले आहे. आता तर सेलिब्रिटीही हे चॅलेंज स्वीकारून ते पूर्ण करण्याचा धडाका लावला आहे. 

#Kekechallenge videos adah sharma nora fatehi karishma sharma accepts kikichallagne | #Kekechallengeने झपाटले! निया शर्मा, करिश्मा शर्मापाठोपाठ अदा शर्माच्या हॉट ‘अदां’नी लावली आग!!

#Kekechallengeने झपाटले! निया शर्मा, करिश्मा शर्मापाठोपाठ अदा शर्माच्या हॉट ‘अदां’नी लावली आग!!

googlenewsNext

सोशल मीडियावर रोज नव-नवे चॅलेंज ट्रेंडमध्ये असतात. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळेच हे चॅलेंज हिरहिरीने पूर्ण करताना दिसतात. सध्या नेटिजन्सला  #Kekechallenge नावाच्या चॅलेंजने झपाटले आहे. आता तर सेलिब्रिटीही हे चॅलेंज स्वीकारून ते पूर्ण करण्याचा धडाका लावला आहे. सध्या अदा शर्माचा असाचं एक व्हिडिओ वेगोन व्हायरल होतो आहे. अदाने हे चॅलेंज स्वीकारले आणि ते पूर्णही केले. हे चॅलेंज पूर्ण करतानाचा तिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धूम करतोय. या व्हिडिओतील अप्सरा बनलेल्या अदाच्या हॉट ‘अदा’ सगळ्यांनाच वेड लावणाऱ्या आहेत.


हे चॅलेंज पूर्ण करणारी अदा एकटीच नाही तर सध्या अनेक अभिनेत्री हे चॅलेंज पूर्ण करताना दिसत आहे. त्यांचे व्हिडिओनी इंटरनेटच्या जगात धूम केली आहे.
आता हे चॅलेंज काय ते तुम्हाला जाणून घ्यायचे असणार तर कॅनडाचा रॅपर ड्रेकने सर्वप्रथम हे चॅलेंज दिले. चॅलेंज काय तर त्याच्या ‘स्कोर्पियन’ या अल्बममधील ‘इन माय फीलिंग’ या गाण्यावर चालत्या कारमधून बाहेर पडून डान्स करणे. हेच चॅलेंज स्वीकारून अदाने भररस्त्यात डान्स केला.
अदा शर्माशिवाय नोरा फतेही, करिश्मा शर्मा आणि निया शर्माही हे चॅलेंज स्वीकारताना दिसल्या. 

नोराने चालत्या आॅटोतून उतरून हे चॅलेंज पूर्ण केले. 

करिश्मा शर्मानेही चालत्या कारमधून उतरून डान्स करत हे चॅलेंज पूर्ण केले.

 निया शर्माही भररस्त्यावर हे चॅलेंज पूर्ण करताना दिसली. खरे तर हे चॅलेंज स्वीकारणे धोकादायक आहे. पण तरिही हे चॅलेंज स्वीकारणारे कमी नाहीत. मुंबई पोलिसांनी हे चॅलेंज जीवावर बेतणारे असल्याचे म्हणत, ते स्वीकारण्यात नकार दिला आहे. पण असे असूनही हे चॅलेंज स्वीकारण्याची क्रेज वाढत आहे. सेलिब्रिटी हे चॅलेंज स्वीकारत रस्त्यावर नाचत सुटल्यानंतर तर सध्या याच चॅलेंजची चर्चा आहे.

 

Web Title: #Kekechallenge videos adah sharma nora fatehi karishma sharma accepts kikichallagne

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.